देवणी : तालुक्यातील वडमुरुंबी ,दवण्णहप्पिरगा, अंनतवाडी वंलाडी या गावांना आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी रविवार दि. २० सप्टेंबर रोजी शेतक-यांना भेटून शेतसंवाद साधून निवेदने स्वीकारली. तालुक्यातील परिस्थिती खूपच गंभीर आहे. केवळ आजपुरते नाही, तर अनेकांचे भविष्याचे मोठे नुकसान झाले आहे. खरिप हंगामातील मूग, उडीद, सोयाबिन ही पिके हाताची गेली आहेत. अतिवृष्टीमुळे सर्व पिके गेली आहेत शेतक-यांना तातडीने मदत उपलब्ध करून दिली, तरच त्यांना पुढच्या काळासाठी उभे करता येईल पण त्यासाठी आज तातडीने सरसकट पंचनामे करून आर्थीक स्वरुपात मदत देण्याची गरज आहे.
काही गावातील घरात पाणी शिरले आहे या पाऊसामूळे घरे पडले आहेत राहायला घर नाहीत आणि शेती पूर्णत: उद्ध्वस्त झाली आहेत.त्यामुळे तातडीने आणि रोखीने मदत दिली, तर अनेक कुटुंब सावरता येतील. राज्य सरकारने इतर कारणे बाजुला सारत तातडीने मदत करावी, अशी मागणी आमदार संभाजीराव पाटील ंिनलगेकर यांनी केली आहे.
यावेळी जेष्ठ नेते हावगीराव पाटील, दगडू अण्णा सोंळुखे ,जि प सदस्य प्रंशात पाटील ,तालुका अध्यक्ष काशिनाथ गरिबे , संजय भाऊ दोरवे ,देवणीचे पं स सभापती सौ चिञकला बिरादार, देवणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बालाजी बिरादार, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम पाटील, उपसभापती शंकर पाटील, भाजयुमो अध्यक्ष रामंिलग शेरे, सुधीर भोसले , चंद्रकात महाजन , शिवराज बिरादार, ज्ञानेश्वर बिरादार, बाळासाहेब बिरादार, महेश सज्जनशेट्टी , बालाजी बिरादार , संगम पताळे ,शिवा बिरादार आदीसह शेतकरी बांधव उपस्थित होते
अत्यावश्यक सेवेत अडथळा आणल्यास ७ वर्षे तुरुंगवास, ५ लाखांचा दंड