22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeलातूरशासकीय दरानेच सीटी स्कॅन करा

शासकीय दरानेच सीटी स्कॅन करा

एकमत ऑनलाईन

लातूर : कोरोना चाचणीत सीटी स्कॅनच्या अहवालाची भुमिका महत्वपूर्ण ठरत असल्याने लातूर शहरासह जिल्ह्यात सीटी स्कॅनचे प्रमाण वाढले आहे. अशा परिस्थितीत रेडिओलॉजिस्ट जादा दर आकारुन रुग्णांची आर्थिक लूट करीत असल्याच्या तक्रारी आहेत. सीटी स्कॅनचे शासनाने दर निश्चित केलेले आहेत. त्यामुळे शासकीय दरानेच सीटी स्कॅन करावे, अन्यथा संबंधीत रेडिओलॉजिस्टवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महानगरपालिकचे उपायुक्त शशिमोहन नंदा यांनी दिला आहे..

लातूर शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस प्रचंड प्रमाणात वाढत आहे. परिणामी सर्व प्रकारच्या चाचण्यादेखील वाढत आहेत. त्यामध्ये सीटी स्कॅनच्या अहवालाची भुमिका महत्वपुर्ण ठरत आहे. त्यामुळे सीटी स्कॅनसाठी रेडिओलॉजिस्टकडे रुग्ण व नातेवाईकांची दिवसभर गर्दी दिसून येत आहे. शहरातील सीटी स्कॅन सेंटरवर एचआरसीटी होण्याचे प्रमाण गेल्या महिन्याभरापासून खुप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामध्ये न्युमोनिया आजाराचे निदान करुा छातीत झालेल्या इन्फेक्शनवरुन कोरोनाचेही प्रमाण ठरविण्यात येते. त्यातून तपासणीचे प्रमाणही वाढले आहे. सद्या १६ स्लाइस खालील सीटी स्कॅनला ४ हजार रुपये, १६ ते ६४ स्लाइसच्या सीटी स्कॅनला ४ हजार रुपये आणि ६४ पेक्षा अधिक स्लाइसला ५ हजार रुपये दर आकारला जात आहे.

सर्वसाधारणपणे १६ ते ६४ स्लाईस या क्षमतेच्या मशिन्स एचआरसीटीसाठी वापरण्यात येत आहेत. त्यानूसार मशिनच्या क्षमतेनूसार एचआरसीटी-चेस्ट तपासणीसाठी शासनाने दर निश्चित केले आहेत. एचआरसीटी-चेस्ट नियमित व तातडीच्या तपासणीसाठी समान दर लागु रहातील. एचआरसीटी-चेस्ट तपासणी केल्यानंतर अहवालावर कोणत्या सीटी स्कॅन मशिन्सद्वारे तपासणी केली आहे ते नमुद करणे बंधनकारक आहे. एचआरसीटी-चेस्ट तपासणी करणा-या रेडिओलॉजिस्टने संपूर्ण तपासणी अहवाल देणे आवश्यक आहे. ज्या रुग्णाकडे आरोग्य विमा योजना आहे किंवा एखाद्या रुग्णालयाने किंवा कार्पोरेट, खाजगी आस्थापनेने जर एचआरसीटी तपासणी केंद्राशी सामंजस्य करार केलेला असेल त्यासाठी शासकीय दर लागु राहणार नाहीत.

अन्यथा सर्व रुग्णालये, तपासणी केंद्र यांनी एचआरटीसी-चेस्ट तपासणीसाठी निश्चित केलेले दर (मशिनच्या प्रकारानूसार) दर्शनी भागात लावणे तसेच निश्चित दरानूसारच दर आकारणी करण्याबाबत हॉस्पिटल व्यवस्थापनाला सूचना देणे बंधनकारक आहे. एचआरसीटी -चेस्ट तपासणीसाठी निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारणी केल्यास संबंधीतांवर कारवाई करण्यात येणर आहे, असेही मनपा उपायुक्त शशिमोहन नंदा यांनी म्हटले आहे.

प्रिस्क्रीप्शन्सशिवाय ही सीटी स्कॅन नको
सद्य:स्थितीत कोणत्याही डॉक्टरच्या प्रिस्क्रीप्शन्सशिवाय एचआरसीटी करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्या तपासणीमध्ये किरणोत्सर्जनद्वारे तपासणी असल्याने जोखीम असते. यासाठी नोंदणीकृत डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शन्सशिवाय ही तपासणी करु नये.

नांदेड जिल्ह्यात १ ८५९ कोरोना बाधित

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या