लातूर : प्रतिनिधी
राज्यात अव्वल स्थानावर असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने जिल्ह्यातील शासकीय व अशासकीय पगारदार कर्मचा-यांना पगार तारणावर १० लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक कर्ज पुरवठा व्हायचा मात्र जिल्ह्यातील शिक्षक संघटना यांनी कर्ज पुरवठा वाढ करावी व व्याज दर कमी करावे, अशी मागणी केली होती त्यानुसार बँकेचे मार्गदर्शक माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत १५ लाख रुपयांपर्यंत सर्वच शासकिय व अशासकीय पगारदार कर्मचा-यांंना कर्ज देण्याचा निर्णय घेतला.
या वैयक्तिक कर्जासाठी सिव्हिल स्कोर प्रमाणे १०.५० ते ११.५० टक्के व्याज दराने कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती जिल्हा बँकेच्या प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या निर्णयामुळे आता जिल्ह्यातील कुठल्याही शासकिय पगारदार कर्मचा-यांना जिल्हा बँकेतून सहज कर्ज मिळणार आहे. कर्जदार यांचा सिव्हिल स्कोर ७५० ते ९०० असल्यास त्यांना १०.५० टक्के व्याज दर, ७०० ते ७४९ पर्यंत ११ टक्के व ६५० ते ६९९ सिव्हिल स्को्रर असल्यास त्यांना ११.५ टक्के व्याज दर बँक आकारणार असून यांची अमलबजावणी सुरु करण्यात आली असून अधिक माहितीसाठी नजीकच्या जिल्हा बँकेच्या शाखेस संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आह.
या बैठकीला माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, बँकेचे चेअरमन आमदार धीरज देशमुख, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अॅड. प्रमोद जाधव, संचालक आमदार बाबासाहेब पाटील, संचालक अॅड. श्रीपतराव काकडे, संचालक अशोकराव पाटील निलंगेकर, संचालक पृथ्वीराज शिरसाठ, संचालक एन. आर. पाटील, राजकुमार पाटील, अशोक गोविंदपुरकर, मारुती पांडे, सौ. स्वयंप्रभा पाटील, व्यंकटराव बिरादार, दिलीप पाटील नागराळकर, जयेश माने, अनुप शेळके, लक्ष्मीबाई भोसले, सौ. सपना कीसवे, सौ. अनिता केंद्रे, सुनील कोचेटा, कार्यकारी संचालक हणमंत जाधव उपस्थित होते.