24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeलातूरपोहरेगाव तांड्यावरील निराधारांची पायपीट बंद

पोहरेगाव तांड्यावरील निराधारांची पायपीट बंद

एकमत ऑनलाईन

पोहरेगाव : रेणापूर तालुक्यातील पोहरेगाव तांड्यावरील श्रावणबाळ, संगायो, इंगायो लाभार्थ्यांची बँंिकग सेवेमुळे करावी लागणारी पायपीठ बंद झाल्याने लाभधारकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. तांड्यावरील वृद्ध महिला, पुरुष यांची इंगायो, संगायो, श्रावणबाळ योजनेचे पैसे पोहरेगाव येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत जमा होते. ही पगार घेण्यासाठी ताड्यांवरील वृद्ध महिला, पुरुषांना पायपीट करीत दिवसभर वाट पाहुंन सायंकाळी आणत असत. तांड्यापासून बँकेपर्यत तीन किलोमीटर पायपीट करावी लागायची.

सोसायटीच्या नूतन संचालक मंडळाच्या निर्दशनास आल्यानंतर त्यांनी रेणाचे चेअरमन सर्जराव मोरे यांच्याकडे विनंती केली. त्यांनी जिल्हा बँकेकडे कार्यवाही करुन जवळपास ९० वयोवृद्ध महिला, पुरुषांना या मोबाईल व्हॅन सेवेची सुविधा प्राप्त करुन दिली. लाभार्थ्यांच्यावतीने जिल्हा बँक कर्मचारी व सोसायटी संचालक यांचे आभार मानण्यात आले आहे. यावेळी तांड्याचे नायक तथा संचालक सूर्यकांत राठोड, देविदास राठोड, उपसरपंच शंकर राठोड, गजानंद राठोड, कोंडीराम चव्हाण, गंगाधर राठोड, कोंडीराम चव्हाण, देविदास पवार, अनिल राठोड, किशोर राठोड,अरुण राठोड,सुधाकर जाधव यांच्यासह महिलामधून रुक्मिणीबाई राठोड, मोताबाई राठोड, पारुबाई राठोड, लाडूबाई पवार, शांताबाई राठोड कृतज्ञता व्यक्त केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या