22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeलातूरपाणीटंचाईवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी योजना राबविल्या जाणार

पाणीटंचाईवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी योजना राबविल्या जाणार

एकमत ऑनलाईन

लातूर : औरंगाबाद येथील जायकवाडी प्रकल्प मंडळाचे मुख्यालय लातूर येथे स्थलात्तरीत करण्यास शुक्रवार दि. २८ ऑगस्ट रोजी मान्यता दिली आहे. आमदार धिरज देशमुख यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे लातूरला स्थलात्तरीत झालेले हे कार्यालय लाभक्षेत्र विकास प्राधीकरण या नावाने आस्तीत्वात येणार आहे. या माध्यमातून या परीसरातील सिंचन प्रकल्प मार्गी लावून दुष्काळी परिस्थिती तसेच पाणीटंचाईवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी योजना राबविल्या जाणार आहेत.

लातूर जिल्ह्यातील लातूर लघु पाटबंधारे विभाग, निम्न तेरणा कालवा विभाग, लातूर पाटबंधारे विभाग क्रमांक एक आणि लातूर पाटबंधारे विभाग क्रमांक दोन चारही विभागांची मंडळ कार्यालये बीड जिल्ह्यात असल्याने येथील शेतक-यांच्या गैरसोयीचे होत होती. याकडे लक्ष वेधत आमदार धीरज देशमुख यांनी जलसंपदा विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. जलसंपदा मंत्री मा. जयंत पाटील यांना पत्रही पाठवण्यात आले होते. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून राज्य सरकारने अध्यादेश काढून हे मुख्यालय लातूर येथे स्थलांतरित केले जात आहे, हे स्पष्ट केले आहे.

या बददल आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि वैद्यकिय शिक्षणमंत्री व सांस्कृतिक कार्यमंत्री आणि लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांचे आभार मानले आहेत. लातूर जिल्ह्यात जलसंपदा विभागांतर्गत असलेल्या बांधकामाच्या २ आणि सिंचन व्यवस्थापनाच्या २ अशा चारही विभागांची मंडळ कार्यालये बीड जिल्ह्यात असल्याने शासनाचे सिंचन उद्दिष्टपूर्ती होण्यात विलंब लागत आहे. लातूर जिल्ह्यात सततचा पडणारा दुष्काळ आणि त्यामुळे शेतकरी वर्गात पसरलेली अस्वस्थता यामुळे शेतकरी आत्महत्येस प्रवृत्त होतात. या बाबीचा विचार करावा. सिंचनक्षमता निर्माण करण्याच्या दृष्टीने जलसंपदा विभागाचे कार्यालय लातुरात कार्यान्वित होणे आवश्यक आहे, असेही पत्राद्वारे सांगण्यात आले होते.

या पार्श्वभूमीवर, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ (औरंगाबाद) अधिनस्त, मुख्य अभियंता व मुख्य प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण (औरंगाबाद) अधिनस्त जायकवाडी प्रकल्प मंडळ (औरंगाबाद) या कार्यालयाचे मुख्यालय लातूर येथे स्थलांतरित करून हे कार्यालय आता लाभक्षेत्र विकास प्राधिकरण नावाने कार्यरत राहील, असे सरकारने आज स्पष्ट केले आहे. मंडळ कार्यालयाच्या विभाजनानंतर बीड पाटबंधारे प्रकल्प मंडळ (परळी वैजनाथ) अंतर्गत ४ विभाग व २९ उपविभाग, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण (बीड) अंतर्गत 3 विभाग आणि २४ उपविभाग आणि लाभक्षेत्र विकास प्राधिकरण (लातूर) अंतर्गत ४ आणि १९ उपविभाग ठेवण्यात यावेत, असेही सांगण्यात आले आहे. या नवीन कार्यालयामुळे लातूर जिल्हयातील सिंचन क्षेत्र २० टक्के वरुन ३० टक्केपर्यंत नेणेसाठी प्रकलप हाती घेतले जातील. मागच्या अनेक वर्षापासून प्रलंबीत असलेले तावरजा प्रकल्पाचे ऊंची वाढविणे व गेट दुरूस्तीचे काम गती घेईल. मांजरा, रायगव्हाण जोडकालवा, घरणी, साकोळ जोडकालवा, तिरू नदीवरील बॅरेज उभारणी यासह जिल्ह्यातील इतर सिंचन प्रकल्पाच्या कामाला गती येईल अशी अपेक्षा आहे.

लातूरची विकास प्रक्रीया पून्हा गतीमान
लातूरचा सर्वांगीण विकास साधत असताना या शहराला विभागीय दर्जा प्राप्त करुन देण्यासाठी मागच्या काळात माजी मुख्यमंत्री लोकनेते विलासराव देशमुख यांनी मंत्री आणि मुख्यमंत्री असताना कृषी, पशुसंवर्धन, सहकार, शिक्षण, एसएससी बोर्ड, विद्यापीठ उपकेंद्र, परिवहन, वीज, आरोग्य, क्रीडा, धर्मादाय, एमआयडीसी, प्रदूषण नियंत्रण महामंडळ यासह विविध शासनाची पंचवीस ते तीस विभागीय कार्यालय लातूरमध्ये सुरू केली आहेत. महसूल विभागासाठी इमारतीसह सर्व पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत.

मध्यंतरीच्या काळात राज्यात वेगळ्या विचारांची सरकार सत्तेवर आल्यानंतर मात्र लातूरला नवीन काहीही देण्याऐवजी येथील पाटबंधारे, सिटीसर्वे, पोस्ट यासह काही कार्यालय लातूर येथून इतरत्र हलवण्याची कार्यवाही झाली होती. लातूरची हक्काची रेल्वेही पूढे विस्तारीत करण्यात आली आहे. राज्यात आता महाविकास आघाडीचे सरकार येऊन लातूरचे लोकप्रतिनीधी वैद्यकिय शिक्षणमंत्री व सांस्कृतिक कार्यमंत्री आणि लातूर जिल्हयाचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख या सरकारमध्ये मंत्री म्हणून कार्यरत झाले आहेत.

यामुळे पुन्हा लातूरला पूर्ववैभव प्राप्त करुन देऊन विकासप्रक्रीया गतीमान करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. या प्रक्रीयेचा भाग म्हणून औरंगाबाद येथील जायकवाडी प्रकल्प मंडळ कार्यालय मुख्यालय लातूरला स्थलांतरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, या निमित्ताने या भागातील सिंचन प्रकल्प जलदगतीने पूर्ण होऊन परीसरातील दुष्काळी परिस्थीती आणि पाणी टंचाई यावर कायमस्वरुपी मात करण्यासाठी योजना राबवल्या जाणार आहेत.

एक देश, एकच मतदार यादी करण्याचे काम सुरू होणार : पंतप्रधान कार्यालयाचे संकेत

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या