रेणापूर :कोरोना काळात आपल्या सर्वांना ऑक्सीजनचे महत्व किती आहे हे कळाले आहे. वृक्षारोपन करण्यासाठी सर्वांचे हात सरसावले पाहिजेत. आपण प्रत्येकांनी वृक्षारोपण करुन त्याची जोपासना करणे ही काळाची गरज आहे. असे प्रतिपादन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी केले. आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत सामूहिक / लोकसभागातून ४ हजार वृक्ष लागवड करण्याचे ध्येय तालुक्यातील लखमापुर येथील ग्रामपंचायतीच्या वतीने बुधवारी दि. २० जुलै रोजी गावातून जि.प. शाळेतील विद्यार्थांनी वृक्ष ंिदडी व वारकरी ंिदडी काढून वृक्षारोपन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास जि.प. उप मुख्य कार्यकारी अधिकारी गिरी, गटविकास अधिकारी मोहन अभंगे व उपसरपंच महेश खाडप हे उपस्थित होते. पुढे बोलताना गोयल म्हणाले , ज्या ज्या ठिकाणी जागा रिकामी आहे त्या ठिकाणी वृक्षारोपन करावे तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या घरासमोर झाड लावुन आपल्या गावाची तालुक्यात नाही तर जिल्ह्यात ओळख निर्माण करावी. तर उपसरपंच महेश खाडप यानी ग्रामपंचायतीच्या वतीने विविध उपक्रम राबविले आहेत.
यापूर्वी वृक्षारोपन करण्यात आले आहे. बिहार पॅटर्न व मियावाकी प्रमाणे ४ हजार वृक्ष लागवड करण्याचा मानस आहे. यावेळी ग्रामसेवक यु.व्ही.बनसुडे ,पोलीस पाटील सोमनाथ वेदपाठक,चेअरमन राजेभाऊ खाडप, व्हाईस चेअरमन संतोष धायगुडे, शालेय समिती अध्यक्ष लक्ष्मण भिसे, तंटामुक्ती अध्यक्ष अशोक धायगुडे, चंद्रकांत खाडप, राजेभाऊ खाडप, महादेव खाडप, राम ससाणे, विष्णू खाडप, शद्रिाम इंगळे, गिरीधर धायगुडे, ओम भिसे, अर्जुन इंगोले,दिलीप धायगुडे, सुमीत खाडप,ओमप्रकाश खाडप,किशोर खाडप, दत्ता धायगुडे, दिपक खाडप, रामदास ससाणे,जगन्नाथ धायगुडे,सुग्रीव धायगुडे, रुस्तुम भिसे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार जाधव यांनी मानले. लखमापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांने गावात झाडे लावा, झाडे जगवा , बेटी बचाव, बेटी पढाव असा संदेश दिला. यावेळी मुख्याध्यापक नागरगोजे, जाधव, मुंडे, चलमले, गद्मवार, अंगणवाडीच्या पांचाळ, कमलबाई शिंदे यांनी वृक्षंिदडीसाठी परिश्रम घेतले. तर वारकरी ंिदडीत वारकरी टाळमुद्वंगासह गावकरी, महिला पुरुष सहभागी होते.