25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeलातूररेणा साखर कारखाना परिसरात वृक्षारोपण

रेणा साखर कारखाना परिसरात वृक्षारोपण

एकमत ऑनलाईन

रेणापूर : माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या ७७ व्या जयंती निमित्त गुरुवारी ( दि .२६ मे ) रेणा साखर कारखाना परिसरातील स्मृति स्थळी लोकनेते विलासराव देशमुख यांच्या पुतळ्यास चेअरमन सर्जेराव मोरे यांनी पुष्पहार आर्पण करुन अभिवादन केले. यावेळी कारखाना परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी रेणा साखर कारखान्याचे संचालक माजी आमदार अँड त्र्यंबक भिसे, माजी चेअरमन तथा संचालक यशवंतराव पाटील, संचालक चंद्रकांत सूर्यवंशी प्रवीण पाटील, डॉ संजय हरिदास, तानाजी कांबळे, पंडित राव माने, शहाजी हाके, लालासाहेब चव्हान, अनिल कुटवाड, स्रेहल देशमुख खाते प्रमूख अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळी कारखाना परिसरात कारखान्याचे संचालक माजी आमदार अ‍ॅड त्र्यंबक भिसे, माजी चेअरमन तथा संचालक यशवंतराव पाटील यांच्या हस्ते तसेच सर्व सन्माननीय संचालक मंडळानी वृक्षारोपण करून वृक्ष वाढविणे जोपासणे ही सध्याच्या काळात गरज आहे असे यावेळी बोलताना सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या