23.2 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeलातूरएकाच दिवसात १.८० लाख वृक्षांची लागवड

एकाच दिवसात १.८० लाख वृक्षांची लागवड

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा परिषदेने २०२२-२३ मध्ये ६० लक्ष वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. लातूर जिल्ह्यात वनक्षेत्राचे प्रमाण हे ०.६ टक्के असून ते महाराष्ट्रात सर्वात कमी आहे. वनक्षेत्राचे प्रमाण वाढवून पर्यावरण समतोल साधण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी कंबर कसली असून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी एकाच दिवसात १.८० लाखाची वृक्ष लागवड केली आहे.

जिल्ह्यातील सर्व पं. स. मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी व उप मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी यांनी कार्यशाळा घेऊन जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायत क्षेत्रात मियावाकी वृक्षलागवड, बिहार पॅटर्न वृक्ष लागवड, ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढविणे व अतिक्रमण रोखणेच्या दृष्टीने वृक्षलागवड, फळबाग लागवड, बांबू लागवड, तसेच नियमित पृथलागवड याबाबत सविस्तर मार्गदर्शन करून पं. स. कडून नियोजन करून घेतले आहे.

सर्व पं. स. मध्ये गट विकास अधिकारी यांचे मार्गदर्शन खाली कृषि अधिकारी पं. स. हे नोडल अधिकारी असून वृक्ष लागवड कक्ष तयार केला आहे. या कक्षाकडून ग्रा. पं. मधील योग्य जागांची निश्चिती, खड्डे पाडणे, रोपांचे नियोजन, रोपवाटीकांचे नियोजन व प्रत्यक्ष वृक्षलागवड याबाबत आढावा घेऊन मार्गदर्शन करून वृक्षलागवड कार्यक्रमावर नियंत्रण ठेवले जात आहे. सर्व ग्रामपंचायतीमध्ये किमान १ गुंठा मियावाकी वृक्षलागवड, लोकसंख्ये इनकी नियमीत वृक्षलागवड, बिहार पटन वृक्ष लागवड केली जाणार आहे. ज्या ग्रामपंचायत मध्ये जागा नाही, तिथे खाजगी शेतक-यांना त्यांच्या बोधावर किंवा पडीक जमीनीवर फळबाग लागवड बिहार पॅटर्नमध्ये करून कायमस्वरुपी उत्पन्न व रोजगार उपलब्ध करून दिला – जाणार आहे.

लातूर तालुक्यातील शामनगर १२ नं. पाटी, वरवंटी व आर्वी येथे मुख्य कार्यकारी अधिकारी व उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भेटी देऊन मियावाकी, बिहार पॅटर्न व ग्रा.प.चे उत्पन्नासाठी फळबाग लागवड यांची पाहणी केली. वरवंटी येथे फळबाग लागवड उपक्रम चांगल्या प्रकारे राबविल्याबद्दल ग्रामसेवक शंकर यांचे कौतुक केले. तसेच ग.वि.अ. तुकाराम भालके यांना तालुक्याचे योग्य नियोजन करून वृक्षलागवड मोहीमेस गती देण्याच्या सूचना केल्या.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या