22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeलातूरबिहार पॅटर्न पध्दतीने ३०० नारळाच्या लागवडीचा शुभारंभ

बिहार पॅटर्न पध्दतीने ३०० नारळाच्या लागवडीचा शुभारंभ

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या स्थानिक विकास निधी मधुन लातूर तालुक्यातील सिकंदरपूर ग्रामपंचायतीच्या इमारतीचे काम प्रगती पथावर याची पहाणी करून लातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तुकाराम भालके यांच्या हस्ते बिहार पॅटर्न पध्दतीने ३०० नारळ वृक्षलागवडीचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी सरपंच संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष माधव गंभीरे, सरपंच सौ. रेशमा माधवराव गंभीरे, उपसरपंच पिराजी इटकर, ग्रामपंचायत सदस्य उध्दव गंभीरे, सुरेश इटकर, सुरेश लष्करे, प. स. चे विस्तार अधिकारी नीलेश सोमानी, बांधकाम विभागाचे अभियंता व्ही. बी. बिरादार, शिक्षक कॉग्रेसचे जिल्हा अध्यक्ष केशव गंभीरे, ग्रामविकास अधिकारी संजय घाडगे उपस्थित होते.

लातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तुकाराम भालके – पाटील यांनी सिकंदरपूर येथील जन सुविधा अंतर्गत सुरू असलेल्या विविध विकास कामांची व नवीन ग्रामपंचायत ईमारत बांधकाम पहाणी केली. नवीन वस्ती विठ्ठल नगर येथील खडीकरण-मजबुतीकरण झालेले रस्ते, स्मशानभुमी येथील सुरु असलेल्या आर. सी. सी. कंपाऊंड वाल बांधकाम कामाची पाहणी केली. या स्मशानभुमीत १ हजार २७३ वृक्ष लागवड मिया वाकी पध्दतीने केलेली आहे. तसेच पंधराव्या वित्त आयोगातुन जि. प. शाळा व अंगणवाडीच्या विविध साहित्याचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात माधव गंभीरे यांनी ग्रामपंचायतच्या १७ महीण्याच्या कार्यकाळात राबवलेल्या विविध उपक्रमांची व विकास कामाची सविस्तर माहिती दिली. सुत्रसंचलन रमेश आलापुरे यांनी केले तर आभार संजय घाडगे यांनी मानले. कार्यक्रमास मुख्याध्यापिका लिना स्वामी, आदर्श शिक्षक रमेश आलापुरे, विद्या गायकवाड, उपक्रमशील शिक्षिका संगीता कौडगी, अंगणवाडी कार्यकर्ती, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी मदतणीस सह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या