22.6 C
Latur
Monday, January 18, 2021
Home लातूर कोरोनामुक्त ७३ जणांचा प्लाझ्मा दानच संकल्प

कोरोनामुक्त ७३ जणांचा प्लाझ्मा दानच संकल्प

एकमत ऑनलाईन

लातूर : प्लाझ्मा थेरपी ही अत्यवस्थ कोरोना बाधितांवर उपचारासाठी उपयोगी पडणारी आहे़ ही थेरपी आता लागुही करण्यात आली आहे. दरम्यान लातूरातील १२ नंबर पाटी येथील विलगीकरण कक्षातून कोरोनामुक्त झालेल्या ७३ जणांनी आपला प्लाझ्मा देण्याचा संकल्प केला आहे़ तसे संकल्पपत्र स्वखुशीने आरोग्य विभागाकडे भरुन दिले आहेत.

सध्या सर्वत्र कोरोनाची भिती आहे़ लातूर जिल्ह्यात दररोज कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे़ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांना कोरोनाची लागण झाली होती़ त्यामुळे ते १२ नंबर पाटीवरील समाज कल्याण विभागाच्या एक हजार मुला-मुलींच्या वसतिगृहातील विलगीकरण कक्षात दाखल झाले होते. कोरोनाची कुठलीही लक्षणे त्यांना नव्हती़ दरम्यान तिथे उपचार घेणाºयांसोबत त्यांनी चर्चा करुन प्लाझ्मा दान करण्याचे महत्व पटवून दिले. त्यामुळे तेथील १३५ पैकी ७३ जणांनी प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतला. नुसता निर्णयच घेतला नाही तर तसेच पत्र स्वखुशीने आरोग्य विभागाकडे दिले.

कोरोनामुक्तीसाठी प्लाझ्मा दान करणे ही काळाची गरज आहेक़ोरोनाचे संकट हे संपूर्ण जगावर आहे़ कोरोना बाधितांनी उपचारानंतर बरे झाल्यानंतर प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे या प्रसंगी सांगण्यात आले़ यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ संजय ढगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ गंगाधर परगे, क्वारंटाईन केअर सेंटरचे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ़ श्रीधर पाठक, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ़ माधव शिंदे, गृहपाल भोजने, योग शिक्षिका रामसने, एस़ एऩ कुंभारे, डॉ़ कोमल कांबळे, अनिल राठोडे, कैलास स्वामी, सुरेंद्र सूर्यवंशी, डॉ़ दळवी यांची उपस्थिती होती.

Read More  देवणी तालुक्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या