27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeलातूरकवयित्री उर्मिला कराड यांची किर्ती सदैव अमर राहिल

कवयित्री उर्मिला कराड यांची किर्ती सदैव अमर राहिल

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
‘जीवनाबरोबरच मृत्यू अटळ असतो हे सत्य आहे. परंतू उर्मिला काकूंच्या जाण्याने त्यांची किर्ती कधीही कमी होणार नाही. त्यांच्याकडे जीवन जगण्याची शैली असल्याने त्यांची किर्ती सदैव अमर राहिल. आज संपूर्ण बिहार राज्य सरकारकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पीत करतो.’ अशी भावना बिहारचे साखर उद्योग व कायदा मंत्री प्रमोद कुमार यांनी व्यक्त केली.

ज्येष्ठ कवयित्री, लेखिका आणि माईर्स एमआयटी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या पत्नी वै. उर्मिला कराड यांना सोमवारी मानवतातीर्थ रामेश्वर रूई येथे गोड जेवणानिमित्त भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी बिहार, आंध्रप्रदेश येथील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, आध्यात्मिक क्षेत्रासह अन्य क्षेत्रातील मान्यवरांनी भावपूर्ण श्रध्दांजी वाहिली. यावेळी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, ह.भ.प. तुळशीराम कराड, काशीराम कराड, माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे व्यवस्थापकीय विश्वस्त व कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड, पं. वसंतराव गाडगीळ, केशवकुमार झा, आमदार रमेश कराड, डॉ. हनुमंत कराड, डॉ. मंगेश कराड, डॉ. अर्चनाताई पाटील चाकुरकर, डॉ. सुनिल कराड, राजेश कराड, बालासाहेब कराड, पुनम कराड, प्रा. स्वाती कराड, ज्योती कराड, डॉ. सुचित्रा कराड यांच्यासह कराड परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.

यावेळ हैद्राबादचे आमदार श्रीरंग राजू म्हणाले, डॉ. कराड परिवार आमच्या गावी आल्यावर त्यांनी येथील मंदिरात जाऊन पूजा अर्चा केली. साहित्यीक उर्मिला काकू अतिशय प्रेमळ स्वभावाच्या होत्या. आज त्यांच्या जाण्याने कराड परिवारावर जे दु:ख ओढवले आहे ते सहन करण्याचे बळ दयावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना. माजी राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले, डॉ. कराड घराण्यांशी माझे जवळीक संबंध आहेत. उर्मिला काकू यांना भेटणारा प्रत्येक व्यक्तीला जीवन जगण्याची सतत प्रेरणा मिळत असे. काकूंच्या अचानक जाण्याने जे दु:ख त्यांच्यावर आले त्यातून सावरण्याची शक्ती मिळो. भाजपा प्रवक्ता गणेश हाके पाटील म्हणाले, उर्मिला काकू या साहित्यिक असल्याने त्यांचा आणि माझा जवळचा सबंध होता. त्यांचा आधार हा सर्वांना सावली सारखा होतो.

अतिशय संवेदनशील, प्रतिभाशाली असे त्यांचे व्यक्तीमत्व होते. यावेळी श्रीमती शशीकला भिकाजी केंद्रे, आचार्य रतनलाल सोनाग्रा, गोदावरीताई मुंडे, हभप भगवान महाराज कराड, हभप भानुदास महाराज तुपे, बाबा महाराज काटगावकर, यशवंत महाराज घुले, किसन महाराज पवार, भोसले गुरुजी, दत्ता दत्तात्रय बडवे, पं. उध्दव अप्पेगावकर, दत्ता महाराज तांदळवाडीकर, यशवंत महाराज घुले, बजरंग महाराज फड, श्रीमती सानप, दत्तात्रय बडवे, तुळशीराम गरुजी, व्यावसायीक रूद्र राजू, श्रीमती सानप, मन्मथजी यांच्या बरोबरच अनेकांनी वै. उर्मिला कराड यांच्या आठवणींना उजाळा देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी ह.भ.प. नारायण महाराज उत्तरेश्वर पिंपरिकर यांचे गोड जेवणानिमित्त हरिकिर्तन झाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या