22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeलातूरलातूर शहरात नियम मोडणार्यांवर पोलिसांची कार्यवाही

लातूर शहरात नियम मोडणार्यांवर पोलिसांची कार्यवाही

एकमत ऑनलाईन

लातूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दि. ८ ते १३ मे या कालावधीत कडक निर्बंध जारी केले आहेत. त्यामुळे शहरात शनिवारी गर्दी करणा-यांवर पोलिसांनी कारवाई केली. अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांनी स्वत: रस्त्यावर उतरुन वाहनधारकांवर कारवाई केली. दि. ३० एप्रिल रोजीच्या आदेशातील नमुद वीकेंड लॉकडाऊनमध्ये नमुद निर्बंधाप्रमाणे संपूर्ण लातूर जिल्ह्यात दि. ८ मे रोजी सकाळी ७ वाजल्यापासून दि. १३ मे पर्यंत कडक निर्बंधाचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष पृथ्वीराज बी. पी. यांनी दि. ६ मे रोजी दिला आहे.

या निर्बंधाचे सर्व संबंधित प्रशासकीय विभाग, संबंधीत स्थानिक स्वराज्य संस्थांनी तंतोतंत अंमलबजावणी करावी, असे आदेशात नमुद केले आहे. कोविड-१९ विषाणुचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजाा म्हणून जिल्ह्यात दि. १५ मे रोजी सकाळी७ वाजेपर्यंत निर्बंध लावण्यात आले आहेत. आठवड्यातील शनिवार व रविवार (वीकेंड लॉकडाऊन) ची कडक अंमलबजावणी संपूर्ण जिल्ह्यात लागु करण्यात आली होती. तरी आठवड्यातील शनिवार व रविवार या वीकेंड लॉकडाऊनप्रमाणे दि. ८ ते १३ मे या कालावधीत कडक निर्बंध लागुू करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

जिल्ह्यात शनिवारपासून कडूक निर्बंध लागु होणार आहेत. या विचाराने नागरिकांनी शुक्रवारी सकाळी ७ ते ११ या वेळेत बाजारपेठेत मोठी गर्दी केली होती. किराणा-भूसार मालाच्या खरेदी-विक्रीसाठी एक झुंबड उडाली होती. पोलिसांच्या सुचनांकडेही कोणी लक्ष देत नव्हते. अन्नधान्य, बेकरी प्रोडक्ट, खाद्य तेल आदींच्या खरेदीसाठी गंज गोेलाई, मेन रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर, औसा रोड, अंबाजोगाई रोड, बार्शी रोड आदी भागात एकच गर्दी झाली होती. शुक्रवारची ही गर्दी लक्षात घेता शनिवारी अशी गर्दी होणार नाही, याची पुरेपूर खबरदारी पोलीसांनी घेतलेली दिसून आली. नियम मोडणा-यांवर पोलीस प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात आली. तसेच महानगरपालिकेच्या पथकाने विनामास्क फिराण-यांना दंड आकारला. दरम्यान, नागरिकांनी नियमांचे पालन करावे, विनाकारण घराबाहेर फिरु नये, मास्क, फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझर आदी उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करवे, असे आवाहन पोलिस प्रशासन व महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

कायद्याचे उल्लंघन; ६१०० रुपये दंड वसुल
शहरात विनामास्क फिरण्यावर निर्बंध घालण्यात आलेले आहे. असे असतानाही काही जण विनामास्क फिरताना आढळल्याने महानगरपालिका आयुक्त अमन मित्तल यांच्या आदेशाने मनपा क्षेत्रीय अधिकारी संजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक रवि शेंडगे, गजनन सुपेकर, दत्ता हणमंते, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पुजारी, श्रीमती देशमुख, पवार व त्यांच्या सहकार्यांनी दंडात्मक कारवाई करीत ६ हजार १०० रुपयांचा दंड वसुल केला.

इलेक्शन ड्युटीवरील शिक्षकासह कुटुंबातील तिघांचा कोरोनामुळे मृत्यू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या