31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeलातूरपीपीई किट उघड्यावर

पीपीई किट उघड्यावर

एकमत ऑनलाईन

जळकोट : जळकोट तालुक्यातीलचिंचोली गावाजवळ आतनूरकडे जाणा-या मुख्य रस्त्याच्या बाजूस अज्ञात व्यक्तींनी पीपीई कीट उघड्यावर टाकले त्यामुळेचिंंचोली ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .

कोरोना रुग्णांची देखभाल करण्यासाठीकिंवा त्यांच्यावर उपचार करणा-या डॉक्टरांनी पीपीई किट परिधान केलेला असतो. यामुळे कोरोनापासून संबधित व्यक्तीचा बचाव होतो. यामुळे अनेक जण सध्या ही पीपीई किट परिधान करीत आहेत. तसेच एखाद्याचा कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार होत असतील तर अशावेळी त्यांचा अंत्यविधी करतेवेळी अशा पीपीई किटचा वापर केला जातो.

यांच्या व्यतिरिक्त सहसा कोणीही पीपीई किटचा वापर करीत नाही . मात्र जळकोट तालुक्यातीलचिंचोली ते आतनूर मार्गावर रोडच्या कडेला पिपिई किट कोणीतरी अज्ञात व्यक्तीने टाकल्याचे दिसून आले, अशी माहितीचिंचोली ग्रामपंचायतीचे सदस्य संतोष बट्टेवाड यांनी एकमतशी बोलताना दिली . यामुळे गावात घबराट निर्माण झाल्याची माहिती त्यांनी दिली.

पीपीई किट फेकून देणे योग्य नाही
चिंचोली ते अतनूर रोडवर पिपिई किट कोणी तरी टाकल्याची माहिती मिळाली आपण आतनूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचा-याकडे याबाबत विचारणा केली.आरोग्य विभागाकडे सध्या पांढ-या रंगाच्या पीपीई कीट उपलब्ध आहेत चिंचोली परिसरात आढळून आलेली पीपीई किट निळ्या रंगाचे आहेत. अशा प्रकारे पिपीई किट फेकून देणे योग्य नाही . हे किट तत्काळ जाळून टाकणे महत्त्वाचे आहे, अशी माहिती आतनूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हरेश्वर सुळे यांनी दिली.

नांदेडात आज १ हजार २९३ जणांना रुग्णालयातून सुट्टी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या