24.6 C
Latur
Sunday, October 24, 2021
Homeलातूरजिल्ह्यात १०० आयसीयू व ५०० ऑक्सिजन बेडची तयारी

जिल्ह्यात १०० आयसीयू व ५०० ऑक्सिजन बेडची तयारी

एकमत ऑनलाईन

लातूर : येत्या काही महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, असे म्हंटलं जात आहे. त्यानुषंगाने लातूर जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचना जिल्ह्यात १०० आय. सी. यु. व ५०० ऑक्सिजन बेडची तयारी केली आहे. लहान मुलांसह प्रौढांसाठी व्यवस्था सज्ज ठेवण्याचा प्रयत्न सुरु आहे. तिस-या लाटेचा परिणाम अत्यंत नगण्य राहावा, यासाठी सर्व यंत्रणा सतर्क झाली असून त्यादृष्टीने नियोजन केले जात आहे.

कोरोनाच्या संभाव्य तिस-या लाटेच्या पूर्वी बालकासाठी आवश्यक असलेले पुरेसा औषधी साठा तसेच साहित्य उपलब्ध करुन घेण्याच्या कामाला आरोग्य यंत्रणा लागली आहे. तिसरी लाट बालकांना धोकादायक जरी असली तरी प्रौढ रुग्णसाठी ही तेवढीच व्यवस्था करुन ठेवण्यावर भर दिला जात आहे. सध्या देशात व राज्यात डेल्टा प्लस हा कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत असल्याचे दिसून येत आहे. त्या विषाणूचा आपल्या जिल्ह्यात प्रादुर्भाव अत्यंत कमी प्रमाणात राहावा यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क झाली आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्यापूर्वी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करुन घेण्याचा प्रयत्न आरोग्य यंत्रणेकडून केला जात आहे. लसीकरणाची प्रक्रिया अधिक गतिमान केली जात आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात १०० आय. सी. यु. बेड व ५०० ऑक्सीजन बेडची तयारी केली जात आहे. दुसा-या लाटे पेक्षा ५० टक्के अधिक आय. सी. यू. व ऑक्सिजन बेड वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रशासन तिस-या लाटेच्या अनुषंगाने पूर्वतयारी करत असून या लाटेचा अधिक परिणाम होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे.

लहान मुलांसाठीचा औषधा साठा लवकरच प्राप्त होणार
खाजगी रुग्णालयात १०० आय. सी. य.ु बेड उपलब्ध केले जाणार आहेत. लहान मुलासाठी आवश्यक असणारा औषधी साठा निर्माण केला जात असून तो लवकरच प्राप्त होईल तसेच लहान मुलांना हँडल करण्यासाठी आरोग्य कर्मचारी व डॉक्टर्सना प्रशिक्षण दिले जात आहे.. दुस-या लाटे पेक्षा ५० टक्के अधिक आय. सी. यू. व ऑक्सिजन बेड वाढविले जाणार आहेत.

पालकमंत्री अमित देशमुख यांचा बुस्टर डोस
कोरोनाच्या संभाव्य तिस-या लाटेच्या अनुषंगाने राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दि. २८ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात एक व्यापक बैठक घेवून आय. सी. यु. बेड, ऑक्सिजन बेड, लहान मुलांसाठी आवश्यक औषध साठा, प्रौढ रुग्णांसाठी लागणारी औषधे, व्हेंटिलेटर्स, लसीकरण या संदर्भाने चर्चा करुन महत्वाच्या सुचना व निर्देश दिले आहेत. त्यानूसार जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा कामाला लागली असून तिस-या लाटेचा प्रभाव लातूर जिल्ह्यात अत्यंत नगण्य राहील याची संपूर्ण तयारी केली जात आहेत.

सात वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, राहुल गुप्ता उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे सीईओ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या