22.7 C
Latur
Wednesday, August 12, 2020
Home लातूर लातूर शहरात पावसाची हजेरी

लातूर शहरात पावसाची हजेरी

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर शहरात शुक्रवार, दि. ३१ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. जवळपास पाऊणतास पडलेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काही वेळासाठी दिलासा मिळाला.

शहर व परिसरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून अधून-मधून पाऊस होत आहे. शहरात शुक्रवारी दुपारच्या सुमारास ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास दमदार पावसाने हजेरी लावली. काही वेळानंतर पावसाचा जोर कमी झाला. यानंतर पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. जवळपास पाऊणतास हा पाऊस सुरु होता. पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवरील सखल भागात पाणी साचले होते.

शहरात गुरुवारी दुपारच्या सुमारास काही वेळासाठी पावसाने हजेरी लावल्यामुळे शुक्रवारी सकाळपासूनच उकाडा वाढला होता. त्यामुळे उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. सायंकाळच्या सुमारास झालेल्या या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काही वेळासाठी दिलासा मिळाला.

Read More  जळकोट तालुक्यातील पंधरा हजार शेतक-यांनी भरला सव्वा कोटींचा पीक विमा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,143FansLike
101FollowersFollow