लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र प्रदेश शिक्षक कॉंग्रेसच्या महिला आघाडी जिल्हा सरचिटणीसपदी शीतल सोनकवडे यांची निवड झाली. त्यांना माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते सदर निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले. या प्रसंगी माजी आमदार धर्माजी सोनकवडे, महिला प्रदेश शिक्षक कॉंग्रेसच्या जिल्हा अध्यक्षा बालीका मुळे, जिल्हा शिक्षक कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, मुख्याध्यापिका कुसूमताई महावरकर, प्राचार्य बालाजी महावरकर, प्राचार्य पोसाने, मुख्याध्यापक चोळे, प्राचार्य विभूते, विरेंद्र साबणे आदी मान्यवर उपस्थित होते. या निवडीबद्दल जिल्ह्यातील सर्व स्तरातून शीतल सोनकवडे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
शीतल सोनकवडे यांना निवडीचे पत्र प्रदान
एकमत ऑनलाईन