लातूर : राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी गुरुवार दि. ७ जुलै रोजी दुपारी लातूर शहरातील औसा रोड येथील थोरमोठे पाटील लॉन्स येथे आमदार अभिमन्यू पवार यांचे चिरंजीव परिक्षीत व डॉ. उदय मोहिते पाटील यांची कन्या चैताली यांच्या साक्षगंध सोहळ्यास उपस्थित राहून उभयतांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव, माजी नगराध्यक्ष हमीद शेख, माजी सभापती अजित माने, चंद्रशेखर दंडीमे, राजकुमार पाटील आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी पवार कुटुंबीय मित्र परिवार उपस्थित होते.