23.6 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeलातूरदेशभक्तीपर भावना प्रस्तूत करणे हे एक प्रकारचे संस्कारच

देशभक्तीपर भावना प्रस्तूत करणे हे एक प्रकारचे संस्कारच

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
भावनांचा प्रतिसाद असला की विचारांचे कृतीत रुपांतर होत असते. देशभक्तीपर भावना समाजात प्रस्तूत करणे हे एक प्रकारचे संस्कार करण्याचे काम आहे. सुंस्कार म्हणजे विशिष्ट विचारांना प्रवृत्त करणे आणि त्यातून विशिष्ट कृती घडावी यासाठी प्रयत्न करणे होय, असे प्रतिपादन पद्मभूषण डॉ. अशोक कुकडे यांनी केले.

येथील डॉ. भालचंद्र रक्तपेढीच्या सभागृहात रविवारी भारतीय स्त्री शक्ती लातूर शाखेच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित महिलांसाठीच्या देशभक्तीपर गीतगायन स्पर्धा व ‘राष्ट्रनिर्माण में स्त्री शक्ती’ पुस्तक प्रकाशन सोहळ्यात डॉ. कुकडे बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्ह पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ. कुकडे म्हणाले, देशभक्तीचा समाजासंबंधीचा आत्मियताभाव वाढीस लागण्यासाठी अशा प्रकारच्या उपक्रमांची मदत होते. आपला जुना उत्तम वारसा जागृत करणे, नवीन उपक्रमांची रचना करणे आणि सामाजिकदृष्ट्या समाजजीवन भारुन टाकणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे म्हणाले, आजची तरुण पिढी ही वेगळ्या चॅनेलवरुन चालत आहे. त्यांच्या चॅनेलवर जाऊन आपल्याला विचार करावा लागेल. त्यांच्यापर्यंत चांगले विचार पोहोचवावे लागतील. आपणच आपल्या मुलांचे आदर्श बनले पाहिजे. समाजात चांगल्या लोकांचे संघटन होणे आवश्यक आहे आणि ती काळाची गरज आहे.

‘राष्ट्रनिर्माण में स्त्री शक्ती’ पुस्तक प्रकाशन करण्यात आले. देशभक्तीपर गीतगायन स्पर्धेत १४ महिला संघांनी सहभाग घेतला. एकाहुन एक सरस गाण्यांनी वातावरण देशभक्तीमय झाले होते. प्रथम पारितोषीक श्री श्री रविशंकर विद्यालयाच्या संघाने पटकावला. द्वितीय ज्ञानप्रकाश संगीत समुहास तर तृतीय पारितोषीक संस्कार भारती संघाने पटकावले. केशवराज रेनिसन्स इंटरनॅशनल स्कुल, विवेकानंद रुग्णालय संघ व इंडियन मेडीकल असोसिएशन वुमन्स विंग यांना उत्तेजनार्थ पारितोषीके देण्यात आली.

परीक्षक म्हणुन पा. संदीपान जगदाळे व राधिका पाठक यांनी काम पाहिले. भारतीय स्त्री शक्ती लातूर शाखेच्या अध्यक्षा जयंती आंबेगावकर यांनी प्रास्ताविक केले. भारतीय स्त्री शक्तीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा कुमुदिनी भार्गव यांनी ‘राष्ट्रनिर्माण में स्त्री शक्ती’ पुस्तकाविषयी भूमिका विषद केली. उमा व्यास यांनी सूत्रसंचालन केले,. प्रेमा बाहेती यांनी आभार मानले. यावेळी डॉ. ज्योत्स्ना कुकडे, अ‍ॅड. स्मिता परचुरे, डॉ. माया कुलकर्णी, डॉ. गानू, देवेंद्र कुलकर्णी यांची उपस्थिती होती.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या