24.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeलातूरवह्या, पुस्तकांच्या किमती ५० टक्क्यांनी वाढल्या

वह्या, पुस्तकांच्या किमती ५० टक्क्यांनी वाढल्या

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
कोरोनामुळे गेली दोन वर्षे शाळा ऑनलाईन होत्या. ऑनलाईन शिक्षण देण्यात आले. आता शाळा पुर्वपदावर आल्या आहेत. शाळा ऑफलाईन झाल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण असले तरी वाढत्या महागाईने पालकांची मात्र तारांबळ उडत आहे. सध्या शाळांना सुट्या असल्या तरी नर्सरी ते पहिलीच्या वर्गाला प्रवेश देणे सुरु आहे. त्यामुळे पालकांची धावपळ होत आहे. यंदा वह्या, पुस्तकांच्या किमती ५० टक्क्यांनी वाढल्याने पालकांना महागाईचा भार सहन करावा लागत आहे.

आगामी शैक्षणिक वर्ष दि. १३ जूनपासून सुरु होणार आहे. पालक आपल्या पाल्यांचे नर्सरी ते पहिलीच्या वर्गात प्रवेश निश्चित करीत आहेत. मात्र काही शाळांकडून अधिकचे शुल्क आकारल्याच्या तक्रारी आहेत. विशेष म्हणजे शुल्क भरल्यानंतरच प्रवेश दिला जात आहे. पालक इंग्रजी, सेमी इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
कोरोनाच्या काळात अनेक संकटे आली. या संकटात अनेक पालकांच्या हातचे काम गेले. पोट भरण्यासाठी काही तरी उद्योग, व्यवसाय करुन गुजरान केली जात असताना आता चिंता आहे ती पाल्यांच्या शिक्षणाची. आपला मुलगा चांगल्या शाळेत शिकला पाहिजे, ही सर्वच पालकांची ईच्छा असते परंतू, आर्थिक अडचणीमुळे ही ईच्छा पुर्ण होत नाही. तरीही काही पालक उसनवारी करुन मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश देण्यासाठी धडपड करीत आहेत.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षे शाळा ऑन लाईन होेत्या. आता गेल्या दोन महिन्यांपासून लातूर जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव ब-यापैकी ओसरल्याने शाळा ऑफलाईन सुरु झाल्या आहेत. यंदाच्या शैक्षकणिक वर्षाची सुरुवात दि. १३ जूनपासून होणार आहे. त्यासाठी सर्वत्र तयारी सुरु आहे. शाळा गजबजणार असल्यामुळे पालक आपल्या पाल्यांना प्रवेश निश्चितीसाठी प्रयत्न करीत आहेत. जिल्ह्यातील विविध शाळांकडून प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची प्रवेशपुर्व परीक्षा घेतली जात आहे. गुणवत्तेनूसारच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे. दरम्यान बहुतांश शाळांमध्ये नर्सरी ते पहिलीचे प्रवेश पूर्ण होत आले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या