21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeलातूरज्ञानप्रकाश विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

ज्ञानप्रकाश विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
येथील ज्ञानप्रकाश शैक्षणिक प्रकल्पातील शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या दहावीतील गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा सोमवारी दि ४ जुलै रोजी नरहरे लर्निंग होम येथे पार पडला. या वेळी लातूर विभागीय एस. एस. सी. बोर्डाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग व लातुर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तुकाराम भालके प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. नरहरे लर्निंग होमच्या वतीने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले या वेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी सामुहिक गीत गायन करत उपस्थितांची मने जिंकली.

या नंतर दहावीच्या परिक्षेतील गुणवंत विद्यार्थी व पालक यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी माजी विद्यार्थ्यांच्या पालकांनी ही आपले मनोगत व्यक्त केले. पालक डॉ. संदीकर यांनी सांगितले की, आपल्या दोन्ही मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून ईंग्रजी माध्यमांना डावलून ज्ञानप्रकाश या मराठी माध्यमाच्या प्रयोगशील शाळेची निवड केली आणि ज्ञानप्रकाश विद्यालयाने त्यांचा विश्वास सार्थ ठरविल्याची भावना त्यांनी या वेळी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख सतीश नरहरे यांनी केले.आभार सविता नरहरे यांनी मानले. यावेळी माजी विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या