22.2 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeलातूरमहात्मा बसवेश्वरच्या प्रभारी प्राचार्यपदी डॉ. श्रीकांत गायकवाड

महात्मा बसवेश्वरच्या प्रभारी प्राचार्यपदी डॉ. श्रीकांत गायकवाड

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
येथील महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था, लातूरद्वारा संचलित महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी डॉ. श्रीकांत गायकवाड तर डॉ. राजकुमार लखादिवे यांची उपप्राचार्यपदी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिवशंकरप्पा बिडवे यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्ती करून त्यांना नियुक्ती पत्र सुद्धा देण्यात आले. यावेळी महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव मन्मथप्पा लोखंडे, उपाध्यक्ष माधवराव पाटील तपसे चिंचोलीकर, कार्यकारी संचालक अ‍ॅड.काशिनाथ साखरे, संचालक अशोकप्पा उपासे आणि अ‍ॅड. धनंजय मिटकरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष अभिमन्यू रासुरे, संचालक शिवशंकरप्पा खानापुरे, ज्येष्ठ संचालक श्रीकांतप्पा उटगे, संचालक बसवेश्वर बिडवे, संचालक शिवप्पा अंकलकोटे, संचालक अशोकप्पा उपासे, संचालक डॉ. महेश हाळगे, संचालक श्याम आलुरे, संचालक राजेश्वर पाटील आणि संचालक प्रा. जी. एम. धाराशीवे आदि सर्व सन्माननीय संस्था पदाधिकारी, विभाग प्रमुख, पर्यवेक्षक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन करुन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या