लातूर : प्रतिनिधी
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी लातूर जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध कारवाई करण्याकरिता निर्देशित केले होते. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे वाढवणा हद्दीतील अवैध धंद्याविरूद्ध कारवाई करण्याचे अनुषंगाने सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम व परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांचे नेतृत्वात पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक तयार करून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
सदर पथक अवैध धंद्यावर कारवाई करीत असताना दि. २२ मे रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास परिविक्षाधीन पोलिस अधीक्षकअभयंिसह देशमुख यांना मिळालेल्या माहितीवरून पोलीस ठाणे वाढवणा हद्दीतील हळी येथील एका ज्यूस सेंटरच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडमध्ये चालू असलेल्या तिरट जुगारावर छापा मारला. त्या ठिकाणी स्वत:च्या फायद्यासाठी लोकांकडून पैसे घेऊन पत्त्यावर जुगार खेळत व खेळवीत असताना २० जन आढळून आले.
यात जावेद इसाक शेख, युनुस मुजम्मिल शेख, मनोहर नामदेव मसुरे, अहमदपाशा मैनोद्दीन शेख, खलील शरीफ शेख, महबूब मैनोदीन सय्यद, हमजा सत्तारसाब मोमीन, अशोक दत्तराव धुपे, जाकीर पाशासाहेब डांगे, संजय पंढरीनाथ दापके, बालाजी रंगनाथ पेंढारकर, दामोदर नागोराव भांगे, जमीर रफिक शेख, बालाजी नामदेव भंडरपे, जलील मिरासाब शेख, विक्रम विनोद शिंदे, शाहरुख शौकत चौधरी, सोपान दिगंबर बंडेवाड, नितीन विठ्ठलराव मुळे, अनिल कमलाकरबाई कांबळे यांच्यावर पोलीस ठाणे वाढवणा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा २ लाख २७ हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस स्टेशन वाढवण्याचे पोलीस अमलदार सारोळे हे करीत आहेत.