31.7 C
Latur
Friday, March 31, 2023
Homeलातूरकोराळवाडीतील हातभट्टी दारूवर छापा

कोराळवाडीतील हातभट्टी दारूवर छापा

एकमत ऑनलाईन

कासारशिरशी : प्रतिनिधी
निलंगा तालुक्यातील कोराळवाडी येथे अवैधरित्या हातभट्टी दारू तयार होणा-या ठिकाणी कासारशिरशी पोलीस ठाण्याच्या पोलिस पथकाने सकाळी छापामारी केली. यामध्ये रसायन, हातभट्टी निर्मिती करण्याचे साहित्य, हातभट्टीची दारू असा ३ लाख १ हजार ५०० रुपयांचे रसायन, हातभट्टीदारू आणि हातभट्टी निर्मितीचे साहित्य नाश करण्यात आले आहे.

लातूर जिल्ह्यात अवैध रीतीने हातभट्टी दारूची निर्मिती व विक्री करणा-यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस ठाणे कासारशिरशीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रियाज शेख यांच्या नेतृत्वाखाली कोराळवाडी येथे अवैधरित्या हातभट्टी दारू तयार करणा-या ८ व्यक्तीवर पोलीस ठाणे कासारशिरशीच्या पथकाने सकाळी छापामारी केली. यामध्ये ४ हजार ७०० लिटर रसायन, हातभट्टी निर्मिती करण्याचे साहित्य, हातभट्टीची दारू असा ३ लाख १ हजार ५०० रुपयांचे रसायन, हातभट्टीदारू आणि हातभट्टी निर्मितीचे साहित्य नाश करण्यात आले आहे. या कार्यवाहीत शिवशंकर सुभाष बुकले, राम अण्णाराव दगदाडे, अंकुश लहू कानडे, मधुकर ंिलबाजी मिलगिरे, दिलीप दत्तू उमापुरे, बाळू व्यंकट उमापुरे, लक्ष्मण तिमन्ना उमापुरे सर्व रा. कोराळवाडी, वसंत ईरन्ना उमापुरे यांच्यावर कासारशिरशी पोलीस ठाण्यात कलम ६५ (फ) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम प्रमाणे ८ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक रियाज शेख, पोलीस उपनिरीक्षक गजानन क्षीरसागर, पोलिस अमलदार मारुती महानवर, गोरोबा घोरपडे, ज्ञानोबा शिरसाट, श्रीकांत वरवटे, गणेश सोनटक्के, विकास मुगळे, बळीराम मस्के व होमगार्ड यांनी केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या