22.8 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeलातूरपाणी वितरण व्यवस्था सक्षमीकरणास प्राधान्य

पाणी वितरण व्यवस्था सक्षमीकरणास प्राधान्य

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
गेल्या महिन्यात लातूर शहरातील नागरिकांना पिवळ्या पाण्याचा पुरवठा झाला. मांजरा धरणाच्या पाण्यात बायोलॉजीकल कंटेन्स्मुळे पाण्याचा रंग बदलला. नैसर्गीक प्रक्रियेमुळे हे घडले. भविष्यात अशा घटना घडू नये, यासाठी महानगरपालिका प्रशासन धनेगावपासून जलशुद्धीकरण केंद्र, शहरातील जलकुंभ ते जलवाहिन्यांपर्यंची सर्वच पाणी पुरवठा वितरण यंत्रणा सक्षम करण्याचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती लातूर शहर महानगरपालिकेचे प्रशासक आयुक्त अमन मित्तल यांनी दि. २४ मे रोजी पत्रकार परिषदेत दिली.

लातूर शहर पाणीपुरवठा वितरण व्यवस्था, घनकचरा व्यवस्थापन, शहरातील अंतर्गत रस्ते, अमृत योजनेतील जलवाहिन्या, पार्किंग, नो-पार्किंग झोन, वाहतूक व्यवस्था आदींबाबत महानगरपालिका प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांबाबत मााहिती देताना आयुक्त अमन मित्तल म्हणाले, लातूर शहर पाणी पुरवठा योजनेतील त्रुटी दुर करुन शहराला २४ बाय ७ दिवस पाणी देण्याचा प्रयत्न प्रशासन करीत आहे.

गेल्या काही दिवसांत प्रायोगीक तत्वावर काही प्रभागांत आठवड्यातून दोन वेळा पाणी देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून तो प्रयोग यशस्वी झाला तर संपूर्ण शहराला आठवड्यातून दोन वेळा पाणी देण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. लातूर शहराला पाणी पुरवठा होणा-या मांजरा धरणावरील काही कामांना गती देण्यात आली आहे. ओएनजीसीद्वारे काही कामे केली जात आहेत. धरणावरील वरचे आणि खालचे दोन्ही गेट, जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टर बेड, ट्रान्सफार्मर, जॅकवेलच्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक दरवाजे बसविणे या सर्व गोष्टींची सुधारणा केली जात आहे. काही गोष्टी बदलण्यात येत आहेत. पाणी पुरवठा योजनेची वार्षिक देखभाल दुरुस्ती करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

गुंठेवारी संदर्भात संबंधीतांनी आजच अर्ज करणे आवश्यक आहे. मनपाचे पथक कारवाईसाठी आल्यानंतर अर्ज करतो, असे कोणी म्हणले तर आम्ही ऐकणार नाही, असे आवाहन करुन आयुक्त मित्तल म्हणाले, शहरात अनेक बांधकामांच्या ठिकाणी पार्किंग दाखवली आहे, पण जागा सोडलेली नाही. अशांना नोटीसा दिल्या आहेत. त्या जागा मोकळ्या करण्यात येतील. शहरात नाले सफाई मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. शहरात काही सखल भागात पावसाचे पाणी साचते. अशा भागांचा सर्वे केला जाणार आहे. सर्वेनंतर त्या भागात आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहे. शहरातील रस्त्यांवर कचरा दिसणार नाही, यासाठी नियोजन करण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या