26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeलातूरकोरोनाला हरवण्यासाठी आता खाजगी रुग्णालये मैदानात

कोरोनाला हरवण्यासाठी आता खाजगी रुग्णालये मैदानात

एकमत ऑनलाईन

लातूर : कोरोनाच्या संकटाशी मुकाबला करताना प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करत असले तरी फक्त शासकिय आयोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडत होता. कोरोनाला हरवण्यासाठी खासगी रुग्णालयांनी पुढे यावे या पालकमंत्री मा. अमित विलासराव देशमुख यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून सहा रुग्णालयांनी प्रत्यक्ष कार्य सुरू केल्याची माहिती लातूर चे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली. ते फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील जनतेशी संवाद साधत होते.

लातूर मधील सहा खाजगी रुग्णालयांनी कोरानाशी दोन हात करण्याची मानसीकता दाखवली होती. या मध्ये अल्फा हॉस्पिटल, बनसोडे हॉस्पिटल, एमआयटी हॉस्पिटल, कादरी हॉस्पिटल, विवेकानंद हॉस्पिटल, लातूर स्पेशालिटि हॉस्पिटल यांचा समावेश असून हे रुग्णालये प्रत्यक्ष सुरू झाली असून जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सर्व आरोग्य यंत्रणांचे आभार व्यक्त केले.

Read More  लातूर जिल्ह्यात आणखी ६८ नवे रुग्ण

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या