लातूर : कोरोना महामारीचा वाढता प्रादूर्भाव लक्षत्तत घेऊन व शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने लातूर शहरातील सर्व खाजगी कोचिंग क्लासेस ७ मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती लातूर जिल्हा कोचिंग क्लासेस असोसिएशनचे पदाधिकारी सुधाकर जोशी, दिलीप बिराजदार, शिवराज मोटेगावकर, रविंद्र धोटे, पी. व्ही. विवेकानंद व प्रमोद घुगे यांनी दिली.
गेल्या वर्षभरात कोरोनाशी लढा देताना आता कुठे कोरोनापासून सुटका होतेय, असे वाटत असतानाच कोरोनाचे पुन्हा डोके वर वाढले. कोरोना विषाणुच्या संसर्गाचा मीटर पुन्हा एकदा वेगाने धावू लागला. त्यामुळे सरकारने खाजगी शिकवणी चालकांसाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीची अंमलबजावणी व पूर्तता करण्यासाठी लातूर जिल्हा कोचिंग क्लासेस असोसिएशन प्रयत्न करीत आहे. या महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी असोसिएशनने दि. ७ मार्चपर्यंत खाजगी शिकवणी वर्गांना सुटी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.
खाजगी शिकवण्यांमधील सर्व विद्यार्थ्यांच्या कोरोना चाचण्या घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या तपासण्या व त्यानंतरची परिस्थिती हाताळण्यासाठी व कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी दि. ७ मार्चपर्यंत खाजगी शिकवण्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
एसटीत गळफास घेऊन वाहकाने केली आत्महत्या