23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeलातूरप्रा. चिराग सेनमा शिवरत्न पुरस्काराने सन्मानित

प्रा. चिराग सेनमा शिवरत्न पुरस्काराने सन्मानित

एकमत ऑनलाईन

लातूर : शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी करून लातूर शहराचे नावलौकिक देशभर वाढवल्याबद्दल नामांकित शिक्षण संस्था असलेल्या आयआयबी इन्स्टिट्यूट, लातूरचे अकॅडमिक डायरेक्टर व बायोलॉजी विषयाचे तज्ज्ञ प्रा. चिराग सेनमा यांना शिवरत्न पुरस्कार व मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त मागील नऊ वर्षांपासून लातूर मिशन व शिवदर्शन प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा मानाचा शिवरत्न पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पार पडला यावेळी प्रा. चिराग सेनमा यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी, या पुरस्कार प्रदान सोहळ्यास लातूर महानगरपालिका आयुक्त अमन मित्तल, दिशा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजीत देशमुख, रेणा सहकरीचे चेअरमेन सर्जेराव मोरे, महाराष्ट्र राज्य बाजार समितीचे उपसभापती संतोष सोमवंशी, माजी महापौर स्मिता खानापुरे, उत्तमराव वाघ, ह.भ.प.अवधूत महाराज एकंबेकर, लातूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे, लातूर मिशनचे भारत जाधव, पत्रकार बांधव उपस्थित होते.

आयआयबीच्या नावाने सेवा सुरू
प्रा. चिराग सेनमा यांनी दहा वर्षापूर्वी पुणे शहरातील अल्फा क्लासेस येथून ज्ञानदानाच्या कार्याची सुरुवात झाली, त्यानंतर पुण्यातील नामांकित सीटीपीएल आदी शिक्षण संस्थेत तज्ञ प्राध्यापक म्हणून जबाबदारी निभावत विद्यार्थ्याला त्याच्या सर्वोच्च ध्येयापर्यंत पोहचवण्याचे दिव्य कार्य पार पाडले. पुणे शहरातून सुरू झालेला हा ज्ञानदानाचा प्रवास पुढे लातूर शहरातील नामांकित ‘राजर्षी शाहू महाविद्यालय ‘व मागच्या सात वर्षांपासून ‘आयआयबी’ या देशपातळीवरील अग्र मानांकित शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अविरत चालू आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या