लातूर : प्रतिनिधी
विद्यार्थ्यांनो! तुमच्या सर्वांगीण विकासासाठी तुमचे आई-वडील सातत्याने कष्ट करतात आणि आपल्याला सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देतात. त्यामुळे आपण सर्वांनी आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचे स्मरण करून आपली शैक्षणिक प्रगती साधली पाहिजे, असे प्रतिपादन कवी योगीराज माने यांनी केले.
महात्मा बसवेश्वर कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्रेहसंमेलनाचे उद्घाटक म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव मन्मथप्पा लोखंडे हे होते. तर विचार मंचावर संचालक अॅड. श्रीकांतप्पा उटगे, प्राचार्य डॉ. दिनेश मौने, उपप्राचार्य डॉ. राजकुमार लखादिवे, उपप्राचार्य प्रा. संजय पवार, उपप्राचार्य प्रा. बालाजी जाधव, प्रा. शिवशरण हावळे, डॉ. श्रद्धा मिसर, प्रा. वनिता पाटील, प्रा. रवींद्र सुरवसे, प्रा. उदय धनुरे यांची उपस्थिती होती.
प्राचार्य डॉ. मौने म्हणाले की, महाविद्यालयांमध्ये बौद्धिक गुणी विद्यार्थ्यांसोबत सांस्कृतिक व कला क्षेत्रात गुणी असणारे विद्यार्थी असतात. वार्षिक स्रेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा असा सातत्याने प्रयत्न केला जातो. विद्यार्थ्यांना परीक्षा व विविध शैक्षणिक कार्यातून थोडा विरंगुळा मिळावा आणि जीवनामध्ये आनंद निर्माण व्हावा यासाठी वार्षिक स्रेहसंमेलन आयोजित केले आहे. यावेळी अॅड. श्रीकांतप्पा उटगे यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोपात लोखंडे म्हणाले की, कविता ही आपले जीवन घडविते. आपण आपले आई-वडील आणि नातेवाईक यांचे स्मरण केले पाहिजे. प्रत्येकाच्या मनामध्ये प्रेमाचा ओलावा असला पाहिजे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कल्पना गिराम, डॉ. टि.घन:श्याम यांच्यासह सोमवसे पूजा, विजय चक्रे, योगेश नागरगोजे, निकिता मोरे आणि चोथवे दिपाली यांनी केले. तर आभार प्रा.वनिता पाटील यांनी मानले.