21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeलातूर६ लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त

६ लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
अहमदपूर शहर परिसरामधील एका किराणा दुकान मधून प्रतिबंधित गुटका व सुगंधित तंबाखूची विक्री होत असल्याचे समजताच स्थानीक गुन्हे शाळेच्या पोलिस पथकाने धाड टाकून ५ लाख ५२ हजार ६३८ रुपयांचा प्रतिबंधित असलेला गुटखा व सुगंधित तंबाखूचा मुद्देमाल केला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात पोलिस अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करून जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढून त्यावर कारवाई करण्याची मोहीम राबवित आहेत. त्याप्रमाणे अहमदपूर पोलीस स्टेशन हद्दीमधील अवैध धंद्याची माहिती मिळाली की, अहमदपूर शहर परिसरामधील एका किराणा दुकान मधून प्रतिबंधित गुटका व सुगंधित तंबाखूची विक्री होत आहे.

या माहितीची शहनिशा करून सदर ठिकाणी छापा मारला असता केजीएन असे नाव असलेल्या दुकानात शासनाने बंदी घातलेले वेगवेगळया कंपनीचे, महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित असलेले गुटका व सुगंधित पानमसाला असा एकूण ५ लाख ५२ हजार ६३८ रुपयांचा गुटखा व सुगंधित तंबाखूचा माल मिळवून आला. प्रतिबंधित गुटका व सुगंधित तंबाखूची अवैद्य साठवणूक करून विक्री व्यवसाय करणारे इम्रान सिकंदर सय्यद, वय ३र्३, रा. जगदंबा रोड, अहमदपूर याचे कडून सदरचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखा, लातूर येथील पोलीस अंमलदार अंगद कोतवाड यांचे तक्रारीवरून अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करतण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास अहमदपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दुरपडे करीत आहेत. सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात पोलिस अमलदार अंगत कोतवाड, नवनाथ हासबे, राजेश कंचे, माधव बिलापट्टे, तुराब पठाण यांनी पार पाडली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या