37.3 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeलातूरजिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी

एकमत ऑनलाईन

लातूर : शासनाने कोरोना विषाणू प्रार्दुभाव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यात साथ रोग प्रतिबंधक कायदा १८९७, दि. १३ मार्च २०२० पासून लागु करुन अधिसूचना निर्गमित केलेली आहे. केंद्र शासनाकडून दि. २२ मार्च पासून लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. त्यानंतर पुढे विविध टप्प्यामध्ये सदरचे लॉकडाऊन जून अखेरपर्यंत वाढविण्यात आले होते. तद्नंतर जून अखेर पासून विविध टप्प्यामध्ये अनलॉक प्रक्रिया सुरु असून त्याअनुषंगाने दि. २ सप्टेंबर पासून दि. ३० सप्टेंबर दरम्यान अनुज्ञेय व प्रतिबंधीत बाबींसदर्भाच्या सूचना राज्य शासनाकडून प्राप्त झाल्या आहेत.

कोरोना विषाणू प्रार्दुभाव व प्रसार टाळण्याच्या दृष्टीने जिल्हादंडाधिकारी जी.श्रीकांत यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये दि. १ ते ३० सप्टेंबर या कालावधीत लातूर जिल्हयात ५ किंवा ५ पेक्षा जास्त लोक सार्वजनिक ठिकाणी एकत्र येणेस या आदेशाव्दारे मनाई केली असून निर्देशीत केल्याअसून लातूर जिल्हा हद्दीत दि. 30 सप्टेंबर पर्यंत लागू राहतील असे आदेश जारी केले आहे.

सर्व शैक्षणिक संस्था बंद राहतील. ऑनलाईन, दूरशिक्षण अध्ययन प्रक्रियेचे कामकाज करता येईल. सिनेमा गृहे, स्विंिमग पूल, मनोरंजनाची ठिकाणे, प्रेक्षागृहे (मॉल व मार्केट कॉम्प्लेक्स यांचेशी संलग्नीत सह), बार, सभागृह व तत्सम ठिकाणे बंद राहतील. सामाजिक, राजकीय खेळ, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि इतर मोठया प्रमाणावर लोकांची गर्दी होणारे कार्यक्रम प्रतिबंधीत असतील. अत्यावश्यक सेवेतील सर्व आस्थापना यापूर्वी निर्देशित केल्यानुसार नियमित व नियमानुसार सुरु राहतील.

२ सप्टेंबर पासून अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त इतर सर्व आस्थापना वेळोवेळी निर्गमीत केलेल्या निर्बधासह सुरु ठेवता येतील. हॉटेल आणि लॉज कोवीड-१९ चा प्रार्दुभाव वाढू नये याकरिता निर्गमीत नियमावलीचे पालन करुन आस्थापनेच्या १०० टक्के क्षमतेप्रमाणे सुरु ठेवता येतील. सर्व खाजगी कार्यालये ३० टक्के पर्यंतच्या कर्मचारी क्षमतेनुसार सुरु ठेवता येईल. खाजगी कार्यालयात उपस्थित राहणा-या सर्व कर्मचारी यांना कोवीड-१९ चा प्रार्दुभाव पसरु नये याकरिताची सर्व प्रकारची दक्षता घेण्यासंदर्भात अवगत करावे.

आंतरजिल्हा प्रवास करणा-या व्यक्ती व विविध प्रकारच्या मालाची ने-आण करणा-या वाहनांच्या दळणवळणावर प्रतिबंध असणार नाहीत. प्रवासासाठी वाहनांना, नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या ई-पास अथवा परवानगीची आवश्यकता असणार नाही. सर्व प्रकारची खाजगी प्रवासी वाहतुक परिवहनासंदर्भाच्या नियमावलीचे पालन करुन सुरु ठेवता येईल.

खुल्या मैदानावरील शारीरिक क्रिया, व्यायाम यावर निर्बंध असणार नाहीत. वाहतुकीच्या टॅक्सी, कॅब- फक्त अत्यावश्यक कारणासाठी चालक व तीन व्यक्ती. रिक्षा फक्त अत्यावश्यक कारणासाठी चालक व दोन व्यक्ती. चार चाकी फक्त अत्यावश्यक कारणासाठी चालक व तीन व्यक्ती. दुचाकी चालक व एक व्यक्ती प्रवास करू शकता. त्यासाठी वाहतुकी दरम्यान सर्व व्यक्तींनी मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन तात्काळ कार्यवाही करण्यात यावी, अशा सुचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.

निर्जजुकीकरणाची व्यवस्था करावी सर्व शासकीय कार्यालये सुरु राहणार असून वर्ग अ व वर्ग ब संवर्गातील अधिका-यांची १०० टक्के उपस्थिती राहील. वर्ग अ व वर्ग ब संवर्गा व्यतिरिक्त इतर कर्मचारी ५० टक्के किंवा कमीत कमी ५० कर्मचारी यापैकी जे अधिक असेल त्याक्षमतेनुसार उपस्थित राहतील. सर्व कार्यालयामध्ये शारीरिक अंतर पाळले जावे, मास्क वापरले जावे, तसेच कोवीड- १९ चा प्रार्दुभाव वाढू नये याकरिता सर्व खबरदारी घेण्यात येईल. त्या करिताची दक्षता घेण्यासंदर्भात दक्षता अधिका-यांची नियुक्ती करण्यात यावी. प्रत्येक कार्यालयामध्ये थर्मल स्कॅंिनग, हात धुण्याची सोय, आणि निर्जजुकीकरणाची प्रवेश व बाहेर पडण्याच्या ठिकाणी व्यवस्था करण्यात यावी. सर्व अधिकारी,कर्मचारी यांनी मास्कचा वापर करावा.

शेतक-यांना आगाऊ २५ टक्के पीकविमा मंजूर करा

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या