25.6 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeलातूरलातूरचे गटविकास अधिकारी शाम गोडभरले यांची पदोन्नती

लातूरचे गटविकास अधिकारी शाम गोडभरले यांची पदोन्नती

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शाम गोडभरले यांची पदोन्नतीने त्यांची बदली उस्मानाबाद जिल्हा परिषदेत ग्रामपंचायत पंचायत विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी म्हणून झाली आहे. त्यांच्या कार्यकाळात लातूर पंचायत समितीने राज्य व विभाग स्तरावरचे पुरस्कार लातूर पंचायत समितीला मिळवून देण्यात कामगीरी बजावली होती.

महाराष्ट्र विकास सेवा गट अ मधील गटविकास अधिकारी संवर्गातील अधिका-यांना उपमुख्यकार्यकारी अधिकारी संवर्गात दि. २४ मे रोजी पदोन्नती दिल्याचे शासनाच्या ग्रामविकास विभागाने पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. यात लातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शाम गोडभरले यांची पदोन्नतीने त्यांची बदली उस्मानाबाद जिल्हा परिषदेत ग्रामपंचायत पंचायत विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी म्हणून झाली आहे. त्यांच्या जागेवर मुखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी टी. के. भालके यांची पदोन्नतीने बदली झाली आहे. तर उस्मानाबाद जि. प. मधील पंचायत विभागाचे एन. एस. दाताळ यांची लातूर जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासनात उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदोन्नतीने बदली झाली आहे.

औसा पंचायत समितीचे बीडीओ एस. एम. भूजबळ यांची उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासनात उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदोन्नतीने बदली झाली आहे. जळकोट पंचायत समितीचे बीडीओ सी. एम. ढोकणे यांची कन्नड पंचायत समितीत गटविकास अधिकारी म्हणून बदली झाली. लातूर प. स. चे गटविकास अधिकारी शाम गोडभरले यांच्या पदोन्नतीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुरज शिंदे, उध्दव रसाळ, मारूती माने, विश्वास कावळे, मधुकर जोगदंड, पवन देशमुख, अशोक सावंत, राहूल सुतार उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या