लातूर : प्रतिनिधी
बोलोरो पिकअप गाडी क्रमांक एम.एच. २४ एफ. ९८३६ हि दि. २७ व २८ जून रोजीच्या मध्यरात्री कोणीतरी अज्ञात चोरटयाने सम्राट चौक परिसरातून चोरून नेल्या प्रकरणी गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गांधी चौक पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी चोरीस गेलेल्या पिकअपसह १४ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत २ आरोपींना २४ तासात अटक करण्याची कारवाई केली आहे.
वरिष्ठ पोलिस अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे यांचे नेतृत्वात गुन्ह्यातील अरोपीच्या शोधकामी स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाण्याचे संयुक्त पथक तयार करण्यात आले. गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक कोले हे करीत होते. गुन्ह्याच्या अनुषंगाने पथकास मिळालेल्या माहिती नुसार सम्राट चौक येथून चोरीस गेलेली बोलेरो पिकअप वाहन वैराग ते सोलापूर जाणारे रोडवर एका धाब्याच्या बाजूला लपवून ठेवलेला आहे. अशी माहिती मिळतात सदर पथक वैराग ते सोलापूर जाणारे रोडवरील नमूद ठिकाणी पोहोचून पाहणी केली असता गुन्ह्यात चोरीस गेलेले बोलेरो पिकअप तेच असल्याचे निष्पन्न झाले.
पथकाने सदर ठिकाणी सापळा लावला थोड्याच वेळात त्या पिकअप मध्ये दोन व्यक्ती बसताना पथकाने त्यांना ताब्यात घेतले व त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव अकबर हसन शेख (३५ रा. फुलेनगर केज जि. बीड. सध्या रा. बरकत नगर, लातूर), सचिन शेषराव मोरे (३३ रा. भीम नगर, परळी जि. बीड. सध्या रा. आनंद नगर, लातूर) असे असल्याचे सांगून नमूद पीकअप वाहन त्याने सम्राट चौक येथून चोरी केल्याचे कबूल केले. त्यावरून आरोपींना त्यांनी गुन्ह्यात चोरलेल्या पिकअप वाहन व चोरी करताना वापरलेली कार सहित १४ लाख रुपयाच्या मुद्देमालसह पोलीस स्टेशन गांधी चौक येथे आणून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
तपास पथकातील पोलीस अधिकारी, अंमलदार यांनी गुन्हा उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने मिळालेल्या माहितीचा बारकाईने अभ्यास व विश्लेषण करून गुन्हा उघडकिस आणून गुन्ह्यात चोरलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे गांधी चौकचे पोलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे यांचे नेतृत्वात पोलीस अमलदार दामोदर मुळे, युसूफ शेख, रणवीर देशमुख, शिवाजी पाटील, दत्ता शिंदे, रणजीत शिंदे, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे दीनानाथ देवकते, प्रमोद तरडे यांनी केली आहे.