लातूर : लातूर जिल्हयातील परिसर स्वच्छ राहवा म्हणून लातूर जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनच्यावतीने शाश्वत स्वच्छता आराखडा तयार करून जिल्हयातील ११० सार्वजनीक स्वच्छता गृह बांधण्यासाठीचा प्रस्ताव राज्य शासनाच्या स्वच्छता विभागाकडे पाठवण्यात आला आहे.
लातूर जिल्हा हागणदारी मुक्त अशी घोषणा झाल्यानंतर अनुसूचित जाती, अनुसूचीत जमाती वसाहतीचा परिसर, मोठया बाजार पेठेची ठिकाणे, आशा गावात येणा-या नागरीकांची संख्या विचारात घेवून या ठिकाणच्या परिसरात सार्वजनिक (सामूहिक) शौचालय बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हयातील ७८५ ग्रामपंचायती मध्ये १०० सार्वजनीक शौचालय बांधण्यासाठी आराखडा तयार करून शासनाकडे मंजूरीसाठी पाठवला आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर सार्वजनीक शौचालय बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी शासन १ लाख २० हजार रूपये प्रति स्वच्छता गृहासाठी देण्यात येणार आहेत.
जिल्हयात सध्या ४४ सामूहिक स्वच्छतागृह बांधण्यात येत आहेत. त्यापैकी अहमदपूर तालुक्यातील मावलगाव, औसा तालुक्यातील भंगेवाडी, महादेववाडी, माळकोंडजी, देवणी तालुक्यातील हंचनाळ या अशा या चार गावात सामूहिक स्वच्छता गृह पूर्ण झाले आहेत. तर ४४ गावात स्वच्छता गृह प्रगती पथावर आहेत. या प्रति स्वच्छता गृहासाठी जिल्हा पाणी स्वच्छता विभागाकडून २ लाख १० हजार रूपये, तर ग्रामपंचायतीच्या १५ वित्त आयोगातून ९० हजार रूपये मिळणार आहेत.
४४ स्वच्छता गृहासाठी प्रस्ताव मागविले
लातूर जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनकडे ८८ सामूहिक स्वच्छता गृह बांधण्यासाठी निधी उपलब्ध आहे. त्यापैकी ४४ स्वच्छता गृह बांधण्यासाठी परवानगी देऊन त्यांचे काम सुरू आहे. यातील ४ सामूहिक स्वच्छता गृहाचे काम पूर्ण झाले आहे. तसेच ४४ ग्रामपंचायतीत सामूहिक स्वच्छता गृह बांधण्यासाठी जिल्हयातून प्रस्ताव मागवण्यात येत आहेत. प्रस्ताव आल्यानंतर त्यांना मंजूरी दिली जाणार आहे.
आजपासून विधिमंडळाचे दोन दिवसीय अधिवेशन