19.2 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeलातूरशेतकरी विरोधी कृषि बिलाच्या निषेधार्थ धरणे

शेतकरी विरोधी कृषि बिलाच्या निषेधार्थ धरणे

एकमत ऑनलाईन

निलंगा : केंद्र सरकारने नुकतेच संसदेच्या दोन्ही सभागृहात उत्पादने व्यापार व प्रोत्साहन सुविधा, शेतकरी हक्क आणि सुविधा, दर हमी व कृषी सेवा करार आणि अत्यावश्यक वस्तू दुरुस्ती हे शेतकरी विरोधी तिन्ही कायदे आवाजी मतदानाने पारीत करुन घेतले आहेत. या कायद्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे अस्तित्व संपुष्टात येणार असल्याने केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी कॉग्रेस पक्षाच्या वतीने येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करुन विविध मागणींचे निवेदन उपजिल्हाधिकारी विकास माने यांना देण्यात आले.

शेती व शेतकरी विरोधी कायदे तात्काळ रद्द करण्यात यावेत, हमीभाव आणि कृषी उत्पन्न बाजार समित्या रद्द होणार नाहीत याची कायदेशीर हमी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा बाजार समितीचे सभापती अशोकराव पाटील निलंगेकर, कॉग्रेसचे युवानेते अभय साळुंके, तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, जिल्हाउपाध्यक्ष सुधाकर पाटील, संचालक बालाजी पाटील, पाशा पटेल, शिवाजी वाघमारे, लाला पटेल, अजगर अन्सारी, रवि अग्रवाल, राष्ट्रवादीचे इस्माईल लदाफ, हसन चाऊस, धम्मानंद काळे, बालाजी गोमसाळे, शकील पटेल, अमोल सोनकांबळे, गिरीश पात्रे, पिंटु कांबळे, भीम कांबळे आदी उपस्थिती होते.

आजअखेर ११ हजार ४५४ जणांना कोरोनाची लागण, ३४१ जणांचा मृत्यू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या