रेणापूर प्रतिनिधी
जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना आणि राज्य शासकीय निमशासकीय कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समितीच्या काम बंद संपाच्या दुस-या दिवशी बुधवारीही ( दि १५ ) येथील तहसील कार्यालय समोर एकच मिशन पेन्शनच्या घोषणा देत धरणे आंदोलन केले.
जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या मागणीसाठी राज्यात कर्मचा-यांच्या विविध संघटनाच्या वतीने मंगळवारी (दि १४ ) पासून काम बंद संप सुरू केले आहे. या संपात तालुक्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समिती, जिल्हापरिषद कर्मचारी संघटना राज्य सहकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना , महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, राज्य महसुल कर्मचारी संघटनाच्या माध्यमातून महसूल कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, ग्रामसेवक, तलाठी, पंचायत समिती विभागातील कर्मचारी खाजगी संस्था शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी , कृषी विभागातील कर्मचारी, भुमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी यांनी सहभागी होत येथील तहसील कार्यालयासमोर बुधवारी दि १५ रोजी ही एकच मिशन पेन्शन च्या घोषणा देत धरणे आंदोलन केले .
जो पर्यत जुनी पेन्शन योजना लागु होत नाही तो पर्यंत आम्ही काम बंद आंदोलन करणार असून राज्य सरकारने यांनी याची दखल घेऊन आम्हाला न्याय द्यावा अन्याथा कर्मचा-याच्या रोशाला जावे लागले असा इशारा ही जुनी पेन्शन संघटनेचे रेणापूर तालुकाध्यक्ष, नवनाथ वाघमारे, पं सं विस्तार अधिकारी संघटनेचे निक्सन कुमठेकर, शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन गोपाळ पडिले तलाठी संघटनेचे गोंिवद शिंंगडे, राहूल भूसणर, ग्रामसेवक संघटनेचे गणेश इस्ताळवर , सेवक संघटनेचे रमजान मुंडे यांच्यासह सर्वच विभागच्या कर्मचा-यांंनी दिला. या संपात तालुक्यातील कर्मचारी सहभागी झाले आहेत.