निलंगा : शहरातील विविध मागण्यासाठी युवक काँग्रेसच्या वतीने आज येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले . शहरातील संपूर्ण नगरपालिका हद्दीतील गल्ली बोळामध्ये रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे ती तात्काळ दुरुस्त करण्यात यावी, शहरातील अनेक भागांमध्ये अंधाराचे साम्राज्य झाल्याने चोरीचे प्रमाण वाढले आहे. शहरातील पथदिवे त्वरित सुरू करण्यात यावेत, नगर परिषदेत कायम निवासी मुख्याधिका-यांची नियुक्ती करण्यात यावी, शहरात अनेक भागातील नाल्यांची साफसफाई करण्यात यावी, शहरातील पेठ, शिवाजीनगर, दादापीरनगर व अन्य भागातील दारुविक्री बंद करण्यात यावी या मागण्यांसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर निलंगा युवक काँग्रेसच्या वतीने एकदिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले .
या आंदोलनात युवक विधानसभा अध्यक्ष अमोल सोनकांबळे, युवा तालुकाध्यक्ष मदन बिरादार, मुजीब सौदागर, तुराब बागवान, सबदार कादरी, गिरीश पात्रे, आवेज शेख,जुबेर खतीब, शुभम सूर्यवंशी, आकश सुरवसे, शानवाज,निजाम हाश्मी, अविनाश कळसे, नागेश जगदाळे, धीरज गायकवाड,चांदुरे धनाजी, वैभव कुलकर्णी,सोहेल अक्षय पाटील, अमोल शिंदे, ंिडगबर मस्के, कृष्णा गिरी, नागेश राघो, शेख, अजय कांबळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.