21.4 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeलातूरहर घर तिरंगा उपक्रमाबाबत जनजागृती

हर घर तिरंगा उपक्रमाबाबत जनजागृती

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
आपल्या भारतीय स्वतंत्र सेनानीनी क्रांतिकारी वीर योद्धांनी अथक परिश्रम सामर्थ्याच्या जोरावर इंग्रजांच्या बंदुकीच्या गोळया शेवटच्या श्वासापर्यंत छातीवर झेलत तिरंग्याला सलामी देऊन भारत मातेला आपला प्राण समर्पित करून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. १५ ऑगस्ट रोजी भारताला स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त, केंद्र शासनाने १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा हे उपक्रम राबवण्याचे ठरविले आहे.

देशातील प्रत्येक घरावर आपल्या अस्मितेचा तिरंगा घराघरावर फडकवायचा आहे. मात्र हा तिरंगा फडकवताना तिरंग्याचा कुठल्याही प्रकारे अवमान, अनादर होऊ नये. राष्ट्रध्वज कसा फडकावावा कधी आणि कसा उतरावा राष्ट्रध्वज उभारताना काय नियमाचे पालन करावे यासाठी दयानंद कला महाविद्यालय, लातूर राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी संकल्प पूर्ण जनजागृती चळवळ सुरू केली आहे. या चळवळीच्या माध्यमातून भारतीय नागरिकांना आपल्या राष्ट्र ध्वजाचे महत्व कळावे या उद्देशाने एक तीन मिनिटांचा शॉट व्हिडिओ तयार करून सर्वांना समजेल अशा सोप्या व साध्या पद्धतीने अर्थपूर्ण मांडणी केली आहे.

स्वा.रा.ती.म.विद्यापीठ,नांदेड रा.से.यो.सल्लागार समिती सदस्य भरत पवार, सौरभ पतंगे, अविनाश खांडेकर, आझाद जाधव, अजिंक्य बिराजदार, प्रसाद कोल्हे, आदित्य कुलकर्णी, वैभव बोयणे, ऋषिकेश हळदे, विठ्ठल कोरे, वैष्णवी शितोळे भक्ती जोशी, प्रांजली भोंग इत्यादी स्वयंसेवक स्वयंसेविकांनी यात सहभाग घेतला. या सर्व स्वयंसेवकांची राष्ट्रनिष्ठा राष्ट्राप्रती असणारा प्रेम पाहून स्वा.रा.ती.म.विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र-कुलगुरु डॉ. जोगेंद्रंिसह बिसेन, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी व प्राचार्य डॉ. एस. पी.गायकवाड रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी डॉ.सुभाष कदम डॉ.सुनिता सांगोले, डॉ. मच्छिंद्र खंडागळे, प्रा. विलास कोमटवाड, प्रा. सुरेश शिरसागर, प्रा. महेश जंगापल्ले इत्यादींनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या