लातूर : कोरोना विषाणूने जगभरात धुमाकूळ घातल्याने भारतात विशेषत: लातूरमध्ये कोरोनला रोखण्यासाठी जिल्हाधिकारी बि. पी. पृथ्वीराज यांनी जनता कर्फ्यूची दि. २७ व २८ फेब्रुवारी रोजी हाक दिली होती. त्यास नागरीकांनी प्रतिसाद दिला. या कालावधीत एसटी महामंडळाच्या लातूर विभागाच्या एसटी बसेस जनता कर्फ्यूच्या काळात प्रवाशी अभावी न धावल्याने उत्पन्नात ४० टक्के घट झाली आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लातूर विभागाच्या पाच आगारातून दररोज ३६५ बसेस स्थानिक, तालुका ते तालुका, जिल्हा ते तालुका, जिल्हा ते इतर जिल्हयात बसेस धावतात. या बसेस मधून दिवसाला ९५ – ९६ हजार प्रवाशी प्रवास करतात. त्यातुन एसटी महामंडळाला ४० ते ४२ लाख रूपये दिवसाला उत्पन्न मिळत होते. कोरोना विषाणूने डोके वर काढल्याने जनता कर्फ्यूच्या काळात प्रवाशी अभावी एसटी बसेस न धावल्याने उत्पन्नात घट झाली.
लातूर जिल्हयात पुन्हा कोरोना विषाणूचा प्रसार होऊ लागल्याने कोरोना विषाणूची साखळी रोखण्यासाठी जिल्हाधिकारी बी. पी. पृथ्वीराज यांनी दि. २७ व २८ फेब्रुवारी रोजी जनता कर्फ्यूची हाक दिली होती. त्यास नागरीकांनीही प्रतिसाद दिला. मात्र लातूर विभागातील ३६५ पैकी दि. २७ फेब्रुवारी रोजी ३१७ बसेस धावल्या. या बसेस मधून ६४ हजार प्रवाशांनी प्रवास केल्याने २९ लाख रूपयांचे उत्पन्न एसटी बसेसला मिळाले. तर दि. २८ फेबु्रवारी रोजी २३७ बसेस धावल्या. या बसेसमधून ४२ हजार प्रवाशांनी प्रवास केल्याने एसटी बसेसला २१ लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले.
लॉकडाउनमुळे राज्याची अर्थव्यवस्था मंदावली, महसुलात मोठी घट – राज्यपाल कोश्यारी