37.6 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeलातूरलातूरमध्ये २७, २८ फेब्रुवारीला जनता कर्फ्यू

लातूरमध्ये २७, २८ फेब्रुवारीला जनता कर्फ्यू

एकमत ऑनलाईन

लातूर : गेल्या वर्षभरात लातूर जिल्ह्यातील जनतेने कोरोनाशी यशस्वीपणे लढा दिलेला आहे. तोच लढा पुन्हा एकदा सुरु करण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. जिल्ह्यातील जनतेने स्वयंस्फुर्स्तपणे शनिवार व रविवार दि. २७ व २८ फेबु्रवारी असे दोन दिवस जनता कफयू पाळून एक जबाबदार नागरिक असल्याचे दाखवून द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी दि. २४ फेबु्रवारी रोजी सायंकाळी फे सबुक लाइर््व्हच्या माध्यमातून संवाद साधताना केले. जिल्ह्यातील सद्याची कोरोनाची परिस्थिती काय आहे. त्यावर केलेल्या उपाययोजना आणि नागरिकांनी घ्यावयाची काळजी या विषयी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी फेसबुक लाइर््व्हच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे हेही सहभागी झाले होते.

मागच्या आठ-दहा दिवसांपूर्वी लातूर जिल्ह्यात ४० ते ४२ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळूत येत होते. सद्याच्या परिस्थितीत हा आकडा ९० पर्यंत पोहोचला आहे. ही चिंतेची बाब लक्षात घेता नागरिकांनी प्रशासनाच्या वतीने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालण करावे, असे आवाहन करुन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. म्हणाले की, जनतेने जिल्ह्यात शनिवार व रविवारी जनता जनता कफयू पाळावा. यात स्वयंस्फुर्स्तपणे सहभागी व्हावे. त्यातून अत्यावश्यक सेवा वगळल्या आहेत. त्यामुळे अतिआवश्यक काम असेल तरच घरा बाहेर पडावे अन्यथा दोन दिवस जनता कफयू कडकडीत पाळावा, असे आवाहन केले.

जिल्ह्यात लॉकडाऊन होणार आहे काय? या विषयी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी म्हणाले की, आज परिस्थिती तशी नाही. त्यामुळे आजच्या परिस्थितीवरुन तरी जिल्ह्यात लॉकडाऊन होणार नाही. परंतू, परिस्थिती वेगळी झाली तर मात्र लॉकडाऊनशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे नागरिकांनीच लॉकडाऊन होणार नाही, याची काळजी घ्यावी म्हणजेच गर्दी टाळावी, मास्क वापरावे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळावे, सॅनिटायझरचा वापर करावा. जिल्ह्यातील सर्वच वसतिगृहांची तपासणी केली जाणार आहे. आठवडी बाजार पूर्ववत सुरुच राहणार आहे. मात्र गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले.

या प्रसंगी बोलताना जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे म्हणाले की, शासनाच्या, प्रशासनाच्या नियमांची अंमलबजावणी करण्याचे काम पोलीस प्रशासनाकडे असते. हे करीत असताना महसूल, आरोग्य विभागाचेही सहकार्य असतेच. कोणावर कारवाई करावी, अशी आमची इच्छा नसतेच परंतू जे नियमांचे पालन करीत नाहीत, त्यांच्यावर कारवाई करावीच लागते. मास्क वापरण्याची सूचना सर्वांनी प्रामाणिकपणे पाळावी, असे आवाहन केले.

ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रा होणार नाही
लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वराची महाशिवरात्री यात्रा यंदा होणार नाही. परंतू, नित्य पुजा, अर्चा, अभिषेक होणार आहेत. यात्रेनिमित्त दुधाचा अभिषेक आणि ध्वजारोहन होणार असून त्यासाठी ५० व्यक्तींना परवानगी असेल. या संदर्भाने श्री सिद्धेश्वर मंदीर ट्रस्ट व चॅरिटी कमिश्न यांची बैठक झाली असून या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगीतले.

विद्यार्थ्यांच्या चाचण्या घेण्याची जबाबदारी क्लासेसचालकांची
जिल्ह्यातील खाजगी क्लासेसमध्ये जितके विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करुन घेण्याची जबाबदारी त्या त्या क्लासेसचालकांची आहे. त्यासाठी आवश्यक पथक जिल्हा प्रशासनाच्या वतीने उपलब्ध करुन दिले जाईत. त्यामुळे येत्या ५ ते ६ दिवसांत खाजगी क्लासेस चालकांनी त्यांच्या क्लासेसमधील सर्व विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करुन घेणे बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. म्हणाले.

यूपीएससीच्या परीक्षार्थींना पुन्हा संधी नाही

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,477FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या