24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeलातूरउदगीर शहरात जनता कर्फ्यू कडकडीत

उदगीर शहरात जनता कर्फ्यू कडकडीत

एकमत ऑनलाईन

उदगीर : जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी शनिवार रविवार या दोन दिवशी उदगीर शहरातील व्यवहार बंद होते. त्यामुळे रस्त्यांवर शुकशुकाट होता.. सकाळ पासून उदगीर आतील रस्त्यावर तुरळक वाहतूक होती दरम्यान पोलीस प्रशासन, नगरपालिका, महसूल कर्मचारी, आणि शिक्षकांनी रस्त्यावर उतरून वाहतूक पूर्णपणे थांबवली. तसेच ये-जा करणा-या प्रत्येक दुचाकीस्वारांची चौकशी करून योग्यकारण असल्यांनेचे त्यांना सोडण्यात येत होते. विनाकारण फिरणा-यांना दंडात्मक कारवाई करण्यात येत होती. चार चाकी वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. यावेळी उदगीर शहरातील उमा चौक, शिवाजी चौक ,शाहू चौक, चौबारा रोड,जय जवान चौक, देगलूर रोड तर ग्रामीण पोलीस ठाण्याचे सर्व कर्मचारी आपल्या परिसरात ठीक ठिकाणी बंदोबस्त ठेवला आहे.

लाँकडाऊनमुळे कोरोनाची साखळी तुटणार असल्याने उदगीर शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी घरीच राहणे पसंत केले. शहरातील गल्लीबोळातील दुकानेही बंद ठेवण्यात आली. पहिल्या व दुस-या दिवशी उदगीर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेने प्रशासनाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. दरम्यान हळी-हंडरगुळी, नागलंगाव,मोघा,तोगरी,घोणसी,मलकापुर,निडेबण,मादलापुर,सोमनाथपूर,वाढवणा, लोहारा, करडखेल, हेर, तोंडचिंर, नरगीळ, येथेही शुकशुकाट पहावयास मिळाला. त्यामुळे रस्त्यावर सर्वत्र सामसुम होती.तर उदगीरशहरात विनाकारण एखादा रस्त्यावर आढळून आल्यास कारवाई केली जात आहे

नियमांचे पालन करण्यातचे आवाहन
उपजिल्हाधिकारी प्रविण मेंगशेट्टे, तहसीलदार रामेश्वर गोरे, मुख्याधिकारी भारत राठोड, उपविभागीय पोलिस अधिकारी डॅनियल बेन, उदगीर शहर पोलीस निरीक्षक गोरख दिवे, ग्रामीण पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे यांच्यासह त्यांचे सर्व कर्मचारी उदगीर शहरासह ग्रामीण भागात लक्ष ठेवून आहेत. यावेळी नागरिकांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले.

कडक लॉकडाऊन नाही पण निर्बंध असणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या