28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeलातूरअरुण समुद्रे यांच्या ‘लक्षवेधी’चे प्रकाशन

अरुण समुद्रे यांच्या ‘लक्षवेधी’चे प्रकाशन

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
येथील पत्रकार अरुण समुद्रे यांनी देवगिरी तरुण भारत, साप्ताहिक विवेक, लोकराज्य यामध्ये लिहलेल्या लेख आणि बातम्यांचा संग्रह असणारा ‘लक्षवेधी’ या ग्रंथाचे मान्यवरांच्या हस्ते दि. २८ ऑगस्ट रोजी प्रकाशन झाले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी रुद्राणी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे चेअरमन विवेक देशपांडे तर पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक दासू वैद्य, ज्येष्ठ पत्रकार तथा संपादक मनोहरराव कुलकर्णी यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमास खासदार सुधाकरराव शृंगारे, माजी मंत्री आमदार संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, माजी आमदार वैजनाथराव शिंदे, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, माजी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार आदींसह मान्यवर उपस्थित होते.

‘लक्षवेधी’ मध्ये ३४ लेख आहेत. हे लेख म्हणजे लुकलुकणारे ३४ अक्षर दिवे आहेत.अरुण समुद्रे यांच्या लेखनात तळमळ आहे. ज्याला प्रश्न पडतो तो व्यक्ती जिवंत मानला जातो. पत्रकार आणि लेखकांनाही असे प्रश्न पडतात. प्रश्न पडल्यानेच समुद्रे यांची लेखणी कार्यरत राहिली. त्यांनी सामान्य लोकांचे प्रश्न नुसते मांडलेच नाहीत तर त्याची उत्तरेही शोधून दिली, असे यावेळी मनोगत व्यक्त करताना दासू वैद्य म्हणाले. यावेळी विवेक देशपांडे, मनोहरराव कुलकर्णी, पत्रकार अतुल देऊळगावकर, प्रदीप नणंदकर, कल्पना भट्टड यांनी मनोगत व्यक्त केले.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. पीयुष देशमुख, निखिल समुद्रे, सायली देशमुख यांनी उपस्थितांचे स्वागत केले.अरुण समुद्रे यांनी मनोगत व्यक्त करताना पुस्तक प्रकाशनामागची भूमिका विषद केली. यावेळी नागपूर तरुण भारतचे संपादक गजानन निमदेव व के. के. ग्राफिक्सचे किरण कुलकर्णी यांचा विवेक देशपांडे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. सायली समुद्रे-देशमुख व निखिल समुद्रे यांनी केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या