21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeलातूरविलास सहकारी साखर कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन

विलास सहकारी साखर कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
येणा-या गाळप हंगामासाठी मोठ्या प्रमाणातील ऊसाची उपलब्धता लक्षात घेऊन विलास सहकारी साखर कारखाना लि., वैशालीनगर, निवळी कारखान्याचा गळीत हंगाम लवकर व पूर्ण क्षमतेने सुरु करण्यासाठी जय्यत तयारी सुरु केली आहे. याचाच एक भाग म्हणून गुरुवार दि. ४ ऑगस्ट रोजी मिल रोलरचे पूजन व्हाईस चेअरमन रविंद्र काळे व सर्व संचालकांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे. विलास कारखाना कार्यक्षेत्रात गळीत हंगाम सन २०२२-२३ साठी ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. यामूळे कार्यक्षेत्रातील ऊसाचे वेळेवर गाळप होण्यासाठी कारखान्याचे संस्थापक चेअरमन, राज्याचे माजी वैद्यकिय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, माजी पालकमंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख व चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी गळीत हंगाम लवकर सुरु करण्याच्या दृष्टीने तयारी करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

या अनुषंगाने सर्व हंगामपूर्व यंत्रासामुग्री देखभाल व दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर आहेत. मागील गळीत हंगामाप्रमाणे येणारा हंगाम देखील यशस्वी करण्यासाठी सुक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या प्रेरणेतून उभा राहिलेला विलास सहकारी साखर कारखान्याची यशस्वी वाटचाल माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या कुशल नियोजनानुसार, माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार धीरज विलासराव देशमुख आणि कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

मागील गळीत हंगामात २११ दिवस कारखाना चालवून ७,६३,४१७.४७० मे. टन ऊसाचे गाळप करुन ११.१८ टक्के सरासरी साखर उता-याने ८,५३,६१५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. तसेच बी हेवी मोलासेस लॉससह उच्चांकी सरासरी साखर उतारा प्राप्त झाला आहे. ऊस गाळपास आल्यानंतर शेतक-यांना १० दिवसांत एफ.आर.पी. पोटी पहिला अ‍ॅडव्हान्स हप्ता अदा केला आहे. तसेच गाळप हंगाम संपल्यानंतर १०० टक्के एफ.आर.पी. पोटी रक्कम रुपये २११.८५ कोटी ऊस पुरवठादार शेतक-यांना करण्यात आली आहे. त्याचबरोबर ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार यांचे मागील हंगामाचे कमिशन डिपॉझीटसह सर्व बिले अदा करण्यात आली आहेत. पुढील हंगामाकरिता आवश्यक ऊस तोडणी वाहतूक यंत्रणेसोबत करार करण्यात आले असून करार केलेल्या यंत्रणेस पहिली उचल अदा करण्यात आली आहे.

कारखान्याकडे ६० केएलपीडी क्षमतेचा आसवणी प्रकल्प कार्यान्वित असून मागील हंगामात सदरील प्रकल्पामधुन १ कोटी १० लाख ३१ हजार ६७० लिटर स्पिरीटचे उत्पादन झाले असून ९८ लाख ९६ हजार ७६९ लिटर इथेनॉल उत्पादन करुन उत्पादित इथेनॉलचा ऑईल कंपन्­यांना पुरवठा करण्यात आला आहे. तसेच मागील हंगामात सहविजनिर्मिती प्रकल्पामधून ५ कोटी ७९ लाख २३ हजार ४०० युनीट वीज निर्मिती झाली असून त्यापैकी ३ कोटी १४ लाख ६६ हजार ०५२ युनीट वीज महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीस निर्यात करण्यात आली आहे. येणा-या हंगामासाठी कारखाना अंतर्गत बंद हंगाम काळातील सर्व तांत्रीक कामे प्रगतीपथावर असुन सन २०२२-२३ गळीत हंगामाकरिता ८ लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी दिली आहे.

रोलर पूजन कार्यक्रमास व्हाईस चेअरमन रविंद्र काळे, कार्यकारी संचालक संजीव देसाई, संचालक सर्वश्री गोविंद बोराडे, युवराज जाधव, अनंत बारबोले, भैरवनाथ सवासे, गुरुनाथ गवळी, बाळासाहेब बिडवे, नारायण पाटील, अनिल पाटील, रंजित पाटील, गोविंद डूरे, सूर्यकांत सुडे, अमृत जाधव, रामदास राऊत, सुभाष माने, भारत आदमाने, संजय पाटील खंडापूरकर, यांच्यासह युनीट-१ चे अधिकारी, कर्मचारी व कामगार उपस्थित होते

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या