24.6 C
Latur
Monday, January 18, 2021
Home लातूर अतिवृष्टी झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करावेत

अतिवृष्टी झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करावेत

एकमत ऑनलाईन

निलंगा : निलंगा विधानसभा मतदारसंघतील तीनही तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करुन भरपाई देण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे तात्काळ सादर करण्याचे निर्देश संबधित अधिका-­यांना देण्यात याव्यात. तसेच जे कोरोना रुग्ण घरात विलगीकरण करण्यात आलेले आहेत या रुग्णाचा आढावा घेऊन दिवसातून किमान एकदा पाहणी व तिनदा विचारणा करण्यात यावी अशा सूचना माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केल्या.

निलंगा येथे उपजिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टी सुरु आहे. या अतिवृष्टीचा आढावा व सध्या सुरु असलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाय योजनाचा आढावा घेण्यासाठी येथील उपजिल्हाकार्यालयात माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या अध्यक्षेतेत आढावा बैठक घेण्यात आली. या आढावा बैठकीला उपजिल्हाअधिकारी विकास माने, तहसीलदार गणेश जाधव, सुरेश घोळवे, ए.टी. जटाळे, शिरुर अनंतपाळचे एन.एस. शेरखाने, देवणीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत, उपविभागीय कृषी अधिकारी आर. एस. कदम, कृषी अधिकारी संजय नाबदे, ए.बी. चव्हाण, आर.एस. कदम, एस.बी आडे, नायब तहसीलदार ए.ए. महापूरे आदी उपस्थित होते.

निलंगा, देवणी व शिरूर अनंतपाळ तालुक्यातील पिकांच्या झालेल्या नुकसनीची पाहणी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी शेती बांधावर जाऊन केली आहे. या पाहणी दौ-यानंतर येथील उपविभागीय कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी यंत्रणे कडून करण्यात आलेल्या नुकसानीचा अहवाल घेऊन सर्वाना त्वरीत पंचनामे करण्याचा सूचना त्यांनी केल्या. त्याच बरोबर अतिवृष्टीने देवणी तालुक्यातील फुटलेल्या पाझर तलावातील पाण्याने शेतक-­यांचे नुकसान झाले आहे. त्यांना शासना मार्फत नुकसान भरपाई देण्यासाठी शासनकडे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

या बैठकीत कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणा-या उपाय योजनांचा आढावा त्यांनी घेतला. यात कोरोनाने होणारे मृत्यू रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेने रुग्णांशी सुसंवाद साधून योग्य औषधपोचार करण्यात यावेत. तसेच संस्थात्मक विलगीकरण करण्यात आलेल्या रुग्णाची वेळोवेळी तपासणी करण्यात यावी. तसेच त्याची योग्य काळजी घेऊन त्यांच्या उपचाराकडे वरिष्ट अधिका-यांनी लक्ष देण्याच्या सूचना आमदार निलंगेकरांनी यावेळी केल्या आहेत. याचबरोबर घरी विलगीकरणात असलेल्या रुग्णासाठी एक आरोग्य पथक तयार करुन त्यांची दिवसातून किमान एकदा तपासणी व फोन द्वारे तीनदा विचारणा करण्यात यावी अशीही सूचना माजी मंत्री आमदार निलंगेकर यांनी केल्या

कॉम्रेड विठ्ठल मोरे: पुरोगामी डावा विचार निखळला

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या