28.8 C
Latur
Saturday, February 4, 2023
Homeलातूरपुणे-लातूर-अमरावती रेल्वे पुन्हा धावणार

पुणे-लातूर-अमरावती रेल्वे पुन्हा धावणार

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
साधरणत: दोन वर्षापूर्वी बंद करण्यात आलेली पुणे-लातूर-अमरावती हि रेल्वे गाडी आता आठवड्यातून दोन वेळा धावणार आहे. विशेष म्हणजे लातूरकरांच्या सोयीसाठी या गाडीचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. लातूर-पुणे इंटरसिटी रेल्वे सुरुवात करण्यात यावी, अशी लातूरकरांची अनेक दिवसांची मागणी आहे, हि मागणी लक्षात घेऊन खासदार सुधाकर शृंगारे यांनी रेल्वे मंर्त्याकडे पाठपुरावा केला होता.

याबाबत मध्यरेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शामसुंदर मानधना यांनी दिलेली माहिती अशी की, १६ डिसेंबरपासून पुणे-लातूर-अमरावती हि रेल्वेगाडी सुरुवात करण्यात येणार आहे. झिरो बेस्ट टाइमटेबलने देशातल्या अनेक गाड्या कोविड काळात बंद करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये या गाडीचाही समावेश होता. मात्र खासदार सुधाकर शृंगारे यांच्या प्रयत्नांनी हि गाडी पुन्हा सुरुवात करण्यात येत आहे. आठवड्यातल्या शुक्रवार आणि रविवारी हि गाडी पुणे स्टेशनवरुन लातूर, अमरावतीकडे मार्गस्थ होईल तर परतीच्या प्रवासात रविवारी आणि मंगळवारी अमरावती येथून लातूरमार्गे पुणेकडे जाईल. पुणे स्टेशनवरुन हि गाडी रात्री १० वाजून ५० मिनिटांनी सुटेल, लातूर स्टेशनवर पहाटे ५.३० वाजता पोहचेल. परतीच्या प्रवासात हि गाडी अमरावतीवरुन रात्री ७.५० वाजता निघून लातूरला दुस-या दिवशी सकाळी ८.३५ वाजता पोहचेल. तर पुणे शहरात दुपारी ४.२० वाजता पोहचेल. या गाडीचे अगोदरचे वेळापत्रक लातूरकरांच्या फारसे उपयोगाचे नव्हते. मध्यरात्री २.३० वाजता हि गाडी लातूर स्टेशनवर येत होती त्यामुळे या गाडीला प्रवासी प्राधान्य देत नव्हते.

आता मात्र लातूरवरुन पुण्याला जाणा-या आणि पुण्याहून लातूरला येणा-या प्रवाश्यांच्या सोयीचे वेळापत्रक देण्यात आले आहे. हडपसरपासून हि रेल्वे चालविण्यात यावी अशी मागणी होत होती मात्र खासदार सुधाकर शृंगारे यांनी आग्रह धरुन हि गाडी पुणे स्टेशनवरुन सुरुवात केली आहे. या गाडीला उरळीकांचन हा थांबा ठेवण्यात आलेला आहे. पुणे, कुर्डुवाडी, उस्मानाबाद, लातूरमार्गे लातूररोड परळी, परभणी, पूर्णा, हिंगोली, अकोला, अमरावती असा या गाडीचा मार्ग असणार आहे. या गाडीचा क्रमांक ०१४३९ असणार आहे तर परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०१४४० असणार आहे . पुणे-लातूर-अमरावती हि गाडी नियमित करण्याचा खासदार सुधाकर शृंगारे यांचा प्रयत्न केला आहे. लातूरकरांनी या गाडीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या