27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeलातूरजळकोट शहर, तालुक्यात नुकसानीचे पंचनामे

जळकोट शहर, तालुक्यात नुकसानीचे पंचनामे

एकमत ऑनलाईन

जळकोट : जळकोट शहरासह संपूर्ण तालुक्याला बुधवारी रात्री आलेल्या वादळी वा-यामूळे अनेकांच्या घराचे नुकसान झाले आहे. वादळी वा-यासह पडलेल्या पावसाचा सर्वाधीक फटका वाडी व तांडावस्तीला बसला असून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत सुल्लाळी यांच्यावतीने व ग्रामस्थांनी तहसीलदार जळकोट यांना निवेदन देण्यात आले होते. यावेळी तहसीलदार सुरेखा स्वामी यांनी तात्काळ तलाठ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले होते तलाठी अनिल उमाटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामे केले .

जळकोट तालुक्यातील सुल्लाळी, रावजी तांडा, थावरु तांडा, मेघा तांडा येथील घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काही नागरिक व प्राणी जखमी झाले आहेत. लाईटचे पोल उन्मळून पडल्याने वीज संकट निर्माण झाले आहे. तसेच, घरासह शिवारातही पडझड झाल्याने परिसरातील नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानाची प्रशासनाने दखल घ्यावी व प्रत्यक्ष पाहणी करुन नागरिकांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सुल्लाळी व परिसरातील रावजी तांडा, थावरूतांडा व मेघा तांडा येथील नागरिकांनी तहसीलदार जळकोट यांना निवेदनातून केली आहे. या निवेदनात जळकोट तालुका काँग्रेसकाँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष मारुती पांडे, सरपंच शिरीष चव्हाण, विजय राठोड, अनिल राठोड, बाबुराव राठोड व ग्रामस्थानी केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या