22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeलातूरजिल्ह्यात पावणेचार लाख क्विंटल हरभ-याची खरेदी

जिल्ह्यात पावणेचार लाख क्विंटल हरभ-याची खरेदी

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
हरभरा उत्पादक २४ हजार १७३ शेतक-यांनी जिल्हयातील २० हमीभाव खरेदी केंद्रावर ३ लाख ६९ हजार ४७ क्विंटल हरभरा विक्री केला. हमी भावा पेक्षा कमी दर आडत बाजारात असल्याने शेतक-यांनी मोठया प्रमाणात हमी भाव खरेदी केंद्रावर हरभरा विक्रीसाठी आणला होता. लातूर जिल्हयात सरासरी ७३६.४ मिमी पाऊस पडतो. तो गेल्यावर्षी ९७२.३ मिमी म्हणजेच तो वार्षीक सरासरीच्या १३२ टक्के इतका पाऊस झाला होता. सदर पाऊस रब्बी हंगामातील पिकांना पोषक असाच पडला होता.. त्यामुळे जिल्हयातील ३ लाख १८ हजार ८ हेक्टर क्षेत्रावर रब्बीचा पेरा केला. यात सर्वाधिक पेरा हरभ-याचा २ लाख ७१ हजार ४९९ हेक्टर क्षेत्रावर केला होता. हरभरा या पिकाची काढणी झाल्यानंतर शेतक-यांनी आडत बाजारात हरभरा विक्रीसाठी आडत बाजारात आणला. मात्र हरभ-याला ४ हजार १०० ते ४ हजार ९४० असा दर मिळत होता.

तर हमीभाव खरेदी केंद्रावर नोंदणी करणा-या शेतक-यांना हरभरा विक्री नंतर प्रतिक्विंटल ५ हजार २३० रूपये दर मिळत असल्याने शेतक-यांचा हमी भाव खरेदी केंद्राकडे ओढा वाढला. त्यामुळे हरभ-याची हमीभावाने विक्री करण्यासाठी जिल्हयातील २५ हजार ६३४ शेतक-यांनी २० हमीभाव खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी केली. हरभरा खरेदीसाठी शेतक-यांना एसमएस पाठवण्यात आले होते. त्यापैकी २० हमीभाव खरेदी केंद्रावर २४ हजार १७३ शेतक-यांनी ३ लाख ६९ हजार ४७ क्विंटल हरभरा विक्रीसाठी आणला. शासनाने हमी भाव खरेदी केंद्रावर १९३ कोटी १ लाख १७ हजार ३७९ रूपयांचा हरभरा खरेदी केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या