26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeलातूरजिल्ह्यात जलस्त्रोतांचे शुध्दीकरण

जिल्ह्यात जलस्त्रोतांचे शुध्दीकरण

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
पावसाळयात पिण्याच्या पाण्याच्या आड, विहिर, बोअर या स्त्रोतांच्या पाण्यात वाढ होते. स्त्रोतांना वाढणारे पाणी मानवी शरीराला आपयकारक ठरू नये. तसेच जलजन्य आजारांचा उद्रेक होऊ नये म्हणून लातूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून स्त्रोतांच्या पाण्यात क्लोरीनेशन व क्लोरीनवॉश करण्याची मोहिम सध्या राबविण्यात येत आहे. त्यामुळे नागरीकांना पिण्यासाठी शुध्द पाणी मिळणार आहे.

लातूर जिल्हयातील ग्रामपंचायतींच्या अंतर्गत ५ हजार १२७ आड, विहिर, बोअर या स्त्रोतांच्याद्वारे नागरीकांना पाणी पुरवठा होतो. सध्या पावसाळयाचे दिवस असल्याने पावसाचे पाणी जमिनीत मुरते व स्त्रोतांच्या पाण्यात नव्याने वाढ होते. नविन पाणी येऊन स्त्रोत दुषित होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरीकांना गॅस्टो, कॉलरा, हागवन, अतिसार, काविळ, लेप्टो पायरोसीस, विषम ज्वर आदी आजरांना सामोरे जावे लागते. या साथरोगाचा उदे्रक होऊ नये म्हणून लातूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने जलस्त्रोतांचे शुध्दीकरण करण्यात येत आहे. आरोग्य विभागाच्यावतीने दि. २५ जुलै पर्यंत तालुका निहाय, ग्रामपंचायत निहाय, स्त्रोतांचे आरोग्य कर्मचारी, जलसुरक्षक व ग्रासेवकांच्या माध्यमातून क्लोरिनेशनच्या बरोबरच हातपंप, विद्यूत पंप यांचे क्लोरीनवॉशही करण्यात येत आहे.

आजार टाळण्यासाठी क्लोरिनेशन
सध्या पावसाळयाचे दिवस आहेत. सततच्या पावसामुळे पाणी जमिनीत मुरून स्त्रोतांच्या पाण्यात नव्याने वाढ होते. या नविन पाण्याच्या बरोबर जंतूही स्त्रोतात जातात. त्यामुळे पिण्याचे पाणी दुषित होते. या दुषित पाण्यामुळे जलजन्य आजार होऊ नयेत म्हणून क्लोरीनेशन मोहिम हाती घेतली आहे. क्लोरीनेशनमुळे जंतू मरून जातात. त्यामुळे स्त्रोतांच्याद्वारे नागरीकांना शुध्द पाण्याचा पुरवठा होण्यास मदत होते. तसेच क्लोरीनवॉश द्वारे हातपंप व विद्यूत पंप धोण्याचे काम सुरू असल्याची माहिती लातूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे साथरोग अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी यांनी दिली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या