22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeलातूर‘पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती प्रयागअक्का कराड समर्पित जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर

‘पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती प्रयागअक्का कराड समर्पित जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर

एकमत ऑनलाईन

लातूर : विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे तर्फे पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड यांच्या नवव्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून, ज्ञान-विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून आयुष्यभर समाजप्रबोधन व सांप्रदायिक सद्भावनेचे सेवाभावी कार्य समर्पित व निरपेक्ष भावनेने अव्याहतपणे करून, समाजासमोर आदर्श निर्माण करणा-­या, सत्शील प्रवृत्तीच्या, महाराष्ट्रातील थोर तपस्विनी, सतीसाध्वी अशा कुलीन पंचकन्याना ‘पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड समर्पित जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.

यामध्ये संत साहित्याच्या गाढया अभ्यासक व पुणे येथील पुण्यधाम आश्रमाच्या अध्यक्षा माता कृष्णा कश्यप, ज्येष्ठ समाजसेविका व थोर तपस्विनी श्रीमती शशिकला भिकाजी केंद्रे, सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ व ज्येष्ठ समाजसेविका डॉ. तेजस्विनी जनार्दन वाडेकर, निवृत्त प्राचार्यां व आपुलकी या संस्थेच्या संस्थापक संचालिका डॉ. ललिता शरद गुप्ते आणि ज्येष्ठ समाजसेविका श्रीमती लक्ष्मीबाई महादु शेळके यांचा समावेश आहे.

सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, सुवर्णपदक व रोख २१ हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. हा पुरस्कार प्रदान सोहळा शुक्रवार दि. २७ मे रोजी सकाळी १०.३० वाजता मानवतातीर्थ म्हणून ओळखल्या जाणा-या रामेश्वर (रूई), ता. जि. लातूर येथे संपन्न होणार आहे. या समारंभासाठी माजी केद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. नालंदा विद्यापीठाचे कुलपती व जगप्रसिद्ध संगणक तज्ञ डॉ. विजय भटकर हे विशेष सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड असतील, अशी माहिती माईर्स एमआयटी शिक्षण समूहाचे कार्यकारी अध्यक्ष व व्यवस्थापकीय विश्­वस्त राहुल कराड व आमदार रमेश कराड यांनी दिलीे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या