22.5 C
Latur
Saturday, November 26, 2022
Homeलातूरवाहतूक नियंत्रण शाखेचा पाठपुरावा मनपाकडून बेदखल

वाहतूक नियंत्रण शाखेचा पाठपुरावा मनपाकडून बेदखल

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरातील वाहतूकीचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. या वाहतूकीवर नियंत्रण कोणाचे हाच मुळ प्रश्न आहे. कारण वाहतूक शाखेने केलेल्या पाठपुराव्याकडे महानगरपालिका लक्ष देत नाही आणि मनपा लक्ष देत नाही म्हणुन वाहतूक शाखाही ‘चलता है’, च्या भूमिकेत दिसून येते. केवळ देशभाल दुरुस्ती अभावी शहरातील १८ सिग्नलस्ची दुरवस्था झाली आहे. परिणामी वाहतूकीची कोंडी वाहनधारकांना सहन करावी लागत आहे.

लातूर शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यापारी आणि शैक्षणिक शहर असलेल्या लातूर शहरात दररोज हजारो नागरिकांचे येणे-जाणे असते. लातूर शहराची लोकसंख्या सुमारे साडेतीन लाख आहे. तितकीच तरंगती लोकसंख्या शहरात असते. त्यामुळे वाहनांची एकच गर्दी होते. शहरातील मुख्य रस्ते तसे ब-यापैकी मोठे आहेत. परंतू, रस्त्याच्या दोन्ही बाजूने झालेल्या अतिक्रमणामुळे वाहतूकीसाठी खुप कमी रस्ता मिळतो. परिणामी वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. शहरात वाहनांची संख्या खुप मोठी आहे. दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहनांची रांगच रांग लागते. चौका चौकातील सिग्नलस् बंद असल्यामुळे किंवा नादुरस्त असल्यामुळे वाहतूकीचा खोळंबा होतो.

शहरातील विविध चौकांत १८ सिग्नलस् आहेत. त्यापैकी अनेक सिग्नलस् पुर्णत: बंद आहेत. शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या सिग्नलच्या देखभाल व दुरुस्तीचे काम लातूर शहर महानगरपालिकेकडे आहे. महानगरपालिकेने एका खाजगी एजन्सीला हे काम दिले आहे. या एजन्सीने शहरात ज्यावेळी सिग्नल उभे केले तेव्हापासून आजतागायत काही सिग्नल सुरुच झालेले नाहीत.
बहुतांश सिग्नलस् शोभेची वस्तू असल्यासारखे आहेत. राजीव गांधी चौक, आदर्श कॉलनी, खर्डेकर स्टॉप, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नवीन रेणापूर नाका, पीव्हीआर चौक, महात्मा गांधी चौक, हनुमान चौक, छत्रपती राजर्षी शाहू महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, स्वामी विवेकानंद चौक आदी ठिकाणचे सिग्नलस् बंद आहेत. शहरातील बंद सिग्नलस् दुरुस्त करुन आणि सुरु करुन द्यावेत, अशी मागणी लातूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेने महानगरपालिकेकडे केली आहे. परंतू, महानगरपालिका प्रशासनाने अद्याप त्याची दखल घेतलेली नाही. शहरातील सिग्नलस् नादुरुस्त असणे, बंद असणे हा एक मुद्दा आहेच.

मात्र सिग्नलस् दुरावस्थेकडेही महानगरपालिकेचे लक्ष नाही. अनेक ठिकाणचे सिग्नलस् कुजले आहेत. ते कधीही भर चौकात कोसळू शकतात. शिवाय सिग्नलवर झाड्या फांद्या आल्या आहेत. काही ठिकाणी हौशी मंडळींनी अशा प्रकारे आपले शुभेच्छा फलक लावलेले आहेत की, त्यांच्या शुभेच्छा फलकामुळे सिग्नलच दिसत नाहीत. या सर्व बाबी पाहता महानगरपालिकेने शहरातील सिग्नलस्च्या आवस्थेचा सर्वे करणे आवश्यक आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या