21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeलातूरप्रा. हानेगावे यांचा राष्ट्रीय समाजभूषण पुरस्काराने गौरव

प्रा. हानेगावे यांचा राष्ट्रीय समाजभूषण पुरस्काराने गौरव

एकमत ऑनलाईन

निलंगा : तालुक्यातील तगरखेडा येथील सामाजिक कार्यकर्ते, कवी, लेखक, निवेदक, वक्ता व प्रवचनकार- जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेचे प्रदेश संघटक प्रा. सतीश हानेगावे यांना राष्ट्रीय समाजभूषण पुरष्कारांने पुणे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले.

अत्यंत प्रतिष्ठीत अशा सामाजिक व राष्ट्रीय बांधिलकी जोपासत प्रामाणिकपणे काम करणा-या काव्य मित्र संस्था पुण्याच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा राष्ट्रीय रुग्णसेवा पुरस्कार, राष्ट्रीय युवा चेतना पुरस्कार, राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार असे पुरस्कार विविध क्षेत्रातील प्िरतष्ठीत व नामांकित कार्यकर्तृत्व असलेल्या महाराष्ट्र व महाराष्ट्रा बाहेरील व्यक्तींना देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

आषाढी एकादशी, डॉक्टर्स डे, स्वामी विवेकानंद व महामहीम राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून दि. १० जुलै रोजी पत्रकार भवन, गांजवे चौक, नवी पेठ पुणे येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावर्षीचा हा राष्ट्रीय मानाचा पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते, कवी, लेखक, निवेदक, वक्ता व प्रवचनकार- जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेचे प्रदेश संघटक प्रा सतीश हानेगावे यांना पुराष्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बापूराव बन्सी जंजिरे, संजय अडसुळे, संतोष घोलप, भागवत थेटे, सौ.अनुराधा थेटे, सुर्यकांत शेटगार, रमेश होसुरे हे उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या